लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 21 November 2021

लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील

औरंगाबाद :

 जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते ह्या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा no vaccination no petrol या आदेशाचा भंग केल्याचे , मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे , अशा गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार श्रीमती सोनाली जोंधळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व श्री राजेंद्र शिंदे जिल्हा पुरवठा निरीक्षक औरंगाबाद यांनी आज सांयकाळी 8.30 वाजता बाबा पेट्रोल पंप सील केलेला आहे.



No comments:

Post a Comment

Pages