औरंगाबाद :
दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी रिपब्लिकन विद्यार्थी सेना,मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे संविधान गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२६ रोजी सकाळी ११ वाजता संविधानाची महती सांगणारे शेकडो फलक,संविधानाची प्रतिकृती घेऊन ही रॅली नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान येथून निघेल छत्रपती शाहू महाराज ह्यांना मिलकॉर्नर येथे अभिवादन करून भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानाची महती सांगणाऱ्या गीतांचे सादरीकरण करण्यात येऊन शेकडो गॅस फुगे आकाशात सोडून रॅलीचा जल्लोषात समारोप करण्यात येईल.
ह्या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर व विद्यार्थी ह्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रॅलीत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे, प्रा.प्रबोधन बसनसोडे,इंजि.अविनाश कांबळे, ऍड.तुषार अवचार,सागर प्रधान,सम्यक सर्पे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment