वामनदादा कर्डक यांच्या सांगितिक चळवळीचा समर्पित कार्यकर्ता : संजय निवडंगे - सदाशिव गच्चे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 November 2021

वामनदादा कर्डक यांच्या सांगितिक चळवळीचा समर्पित कार्यकर्ता : संजय निवडंगे - सदाशिव गच्चे

आंबेडकरी चळवळीला नवा आयाम देणारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती सोहळ्याचे गेल्या सलग पंधरा वर्षांपासून सातत्याने भव्य स्वरूपात आयोजन करुन महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृति कायम जागवणारा समर्पित कार्यकर्ता म्हणून संजय निवडंगे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

                  संजय निवडंगे हे मूळचे नांदेडपासून 4 किमी अंतरावर असलेल्या कोरका पिंपळगावचे आई प्रयागबाई, वडील दत्ता निवडंगे यांनी 40 वर्षांपूर्वीच गाव सोडून नांदेड शहर गाठलं आणि शहरातील खोब्रागडे नगर येथे आपली पाच मुलं,दोन मुलींसह वास्तव्यास आले. वडील दत्ता निवडंगे यांना गाण्यांची आवड असल्यामुळे ते वामनदादा कर्डक यांची गीते ऐकूण गावातील भजनी मंडळात गात असत. मुलगा संजय निवडंगे हा तानसेन नसला तरी कानसेन मात्र पक्का होता. जिथे वामनदादांच्या गीत गायनाचा कार्यक्रम असेल तिथे संजय हमखास हजेरी लावायचा.

                  वामनदादा कर्डक यांनी आपल्या लेखणी द्वारे गीतगायनातून निस्वार्थपणे समाजाची सेवा करून आंबेडकरी चळवळ जीवंत ठेवण्याचे महान कार्य केले आहे याची जाणीव संजय निवडंगे यांना होती.आणि हाच विचाराचा धागा धरून वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी केली पाहिजे म्हणून निवडंगे यांनी नांदेड येथे 2007 साली वामनदादा कर्डक यांची पपहिली जयंती साजरी केली, ती आजतागायत सुरू आहे. दरवर्षी जयंती निमित्ताने ते महाराष्ट्रातील वामनदादांचे शिष्य असलेल्या कालावंतांना सोबत घेवून तमाम आंबेडकरी जनतेला  वामदादांच्या लेखणीतून साकारलेल्या बुद्ध-भीम गीतांच्या संगीत मैफलीचे आयोजन करत असतात.

             संजय निवडंगे हे निर्व्यसनी,निस्वार्थी,निगर्वी आणि मनमिळावू स्वभावाचे असून वामनदादांची जयंती करत असतांना समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून जवळपास एक महिन्यापासून जयंती कार्यक्रमाची ते जय्यत तयारी करत असतात.सभागृह आरक्षित करणे,प्रमुख अतिथी बोलवणे, डिजिटल बॅनर, कार्यक्रम पत्रिका,व्हिडीओ ग्राफी, फोटो ग्राफर,प्रेस मिडिया तसेच महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना निमंत्रणं देणं त्यांची येण्या-जाण्याची,भोजनाची व निवासाची व्यवसथा करणं आदी बाबींकडे जातीने लक्ष देवून कार्यक्रम यशस्वी करणे ही त्यांची खासियत आहे. 

      गेल्या पंधरा वर्षांपासून निवडंगे यांनी आतापर्येंत  वामनदादांचे शिष्य प्रतापसिंग बोदडे, नागसेनदादा सावदेकर,सुरेश शिंदे,चंद्रकला गायकवाड, वैशाली शिंदे,शाहीर रमेश गिरी,देवा अंभोरे,सखाराम हिरोळे,डी.आर.इंगळे,कल्पना खंडेराय, धम्मा शिरसाठ, विजय मांडकेकर,अशोक निकाळजे, मेघानंद जाधव,कुणाल वराळे, छाया कांबळे, अंजली घोडके,रविराज भद्रे, माधव वाढवे,संदीप राजा, राहुल वाघमारे,ललकार बाबू, मोहन नौबते, शाहीर गौतम पवार,संतोष मंत्री,अशोक चौरे, सपना खरात तर संगीत संयोजनाची बाजू सांभाळणारे सर्व कलावंतांना साथसंगत करणारे नंदू डावरे, शुद्धोधन कदम,समाधान गायकवाड,देवदत्त मेकाले, रतन चित्ते,उत्तम चावरे आदी महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील  नामवंत कलावंतांना आंबेडकरी गीत गायनासाठी डिजिटल मंच उभारून प्रेत्येक कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. डदरवर्षी याच कार्यक्रमात कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते वामनदादा कर्डक यांच्या नावे पुरस्कार देवून सन्मानित केल्या जाते.

                 या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी व बुद्ध-भीम गीत यानातून प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक,वाशीम,अमरावती,यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, आंबेजोगाई, गंगाखेड, अकोला,बुलढाणा,हिंगोली,वसमत, किनवट,  औरंगाबाद,जळगांव,नागपूर,लातूर,जालना,परभणी, तेलंगणा,हैद्राबाद,कर्नाटक आदी राज्यातूनही वामनदादांच्या  लेखणीवर व त्यांच्या कार्यावर प्रेम करणारे कलावंत व श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित राहातात.कार्यक्रमाचे सुरेख नियोजन असल्या कारणाने कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

              कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलावंतांची भोजनाची व निवासाची व्यवस्था संजय निवडंगे व त्यांच्या पत्नी निर्मालाबाई ह्या करतात. कसलाही कंटाळा न करता अगदी आनंदाने हा निवडंगे परिवार वामनदादांच्या जयंती सोहळ्यात समर्पित भावनेने सर्व कालवंतांची सेवा करतात.हा जयंती सोहळा हर्षोल्हासात साजरा  होण्यासाठी प्रा.रविचंद्र हडसनकर,तेलंगणातील सायलूदादा म्हैसेकर,दत्तुकाका वाघमारे,एन.यु.सदावर्ते, 

ऍड.डी.एफ.हरदडकर, डॉ. राजेंद्र गोणारकर,प्राचार्य विकास कदम,नगरसेवक बापूराव गजभारे,सदाशिव शितळकर, रामेशबाबू वाघमारे, व्यंकटेश लोणे, डॉ.गंगाधर लव्हाले, डॉ.कैलास धुळे, इंजि.प्रशांत इंगोले,प्राचार्य मोहन मोरे,सुखदेव चिखलीकर,बालाजी कळेकर,इंजि.डी.डी.भालेराव, इंजि.संघरत्न सोनसळे, चंद्रमुनी सोनसळे,प्रा. दु.मो.लोणे, प्रा.राजपाल चिखलीकर,इंजि. वरमवार, प्राचार्य शेखर घुंगरराव, पत्रकार एल.ए.हिरे, सुनील पंडित,विजय कांबळे, सुजाता पोपुलवार,हसनाळकर,पत्रकार मधुकर गच्चे,सदानंद अंभोरे, डॉ.रवि सरोदे,डॉ.अनंत सूर्यवंशी,डॉ.दिलीप कंधारे,प्राचार्य स.ना.भालेराव,जि.पी.मिसाळे, धडेकर, पुंडलिक कांबळे, विद्याधर घायाळ, संजय बागाटे,सुरेश गजभारे,असे कितीतरी साहित्यिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी वामनदादा कर्डक यांच्या गीतांवर मनापासून प्रेम करतात व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान देत असतात.

            भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवी कल्याणाचा विचार लोकांना समजेल अशा साध्या, सोप्या भाषेत आपल्या लेखणीतून गीतगायनातून  वामनदादांनी आयुष्यभर आंबेडकरी समाजाला वेळो-वेळी सांगितला आहे. आजच्या कलावंतांनी त्यांनी सांगितलेल्या विचाराची पताका घेवून प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवावे असे आवाहन  करून येणाऱ्या काळात अखेरच्या श्वासापर्येंत समाजाच्या आणि कालवंतांच्या बळावर वामनदादा कर्डक यांची जयंती सुरूच राहील असा निर्धार संजय निवडंगे यांनी व्यक्त केला आहे. संजय निवडंगे यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडो हीच मंगल कामना !

                     - सदाशिव गच्चे

No comments:

Post a Comment

Pages