"अनुसूचित जातींच्या विकासाकरिता बेंचमार्क सर्व्हेक्षण महत्वपूर्ण योगदान ठरेल"- श्री.सुखदेवथोरात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 December 2021

"अनुसूचित जातींच्या विकासाकरिता बेंचमार्क सर्व्हेक्षण महत्वपूर्ण योगदान ठरेल"- श्री.सुखदेवथोरात

  नागपुर  :        

भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीतील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  विशेष तरतुदींचा माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय संरक्षण दिले आहे. जातीयता - अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम 17  मध्ये असलेल्या विशेष तरतुदीनुसार कायदे केले आहेत, तरीदेखील "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' साजरा करत असताना अनुसूचित जाती दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या योजना पूर्णतः पोहोचत नाही, त्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी), पुणे मार्फत होत असलेल्या या "बेंचमार्क सर्वेक्षणाची "आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नियोजन आयोगाचे सदस्य मा. सुखदेव थोरात यांनी बार्टीने आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये  दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी सामाजिक न्याय भवन , नागपुर येथे  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना व्यक्त केले.  अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये हे होते. 

 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये 1.30 कोटी म्हणजे आता 13% टक्के आहे. या घटकाच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक योजना राबवण्यात येतात. तथापि त्याचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे , त्यामागील कारणांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातींच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे बार्टीचे मा. महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 

योजनाचा लाभ घेताना मागासवर्गीय जातीतील समाजाला येणाऱ्या अडचणी तसेच अंमलबजावणी यंत्रणा यांना अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून शासनास भविष्यातील योजनांच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेता येतील, या माध्यमादवारे समाजातील वंचित घटकाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असे या सर्वेक्षणाचे महत्व सांगताना त्यांनी नमूद केले.  

यावेळी प्रामुख्याने बेंचमार्क सर्व्हेक्षण प्रत्येक विभागात एका गावाची निवड पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून याबाबत मुलाखत अनुसूची यासह संशोधन कार्य करित असताना आवश्यक त्या प्रमाणात माहिती संकलन करिता महत्वपूर्ण मुद्दे याविषयी मा. सुखदेव थोरात  यांच्या समवेत,  बार्टी उपकेंद्र,नागपूर येथे बैठक संपन्न झाली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, श्री उमेश सोनवणे उपायुक्त , श्रीमती वृषाली शिंदे उपायुक्त, श्रीमती स्वाती मोकाशी लेखाधिकारी, श्री नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक, डॉ. सिध्दार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त , नागपूर तसेच संशोधन विभागातील संशोधन अधिकारी श्रीमती शुभांगी सुतार , श्रीमती नीता बर्जे तसेच समतादुत विभाग संशोधन अधिकारी श्रीमती शिल्पा शिवणकर, उप लेखापाल  श्रीमती प्रीती दुरुगकर, प्रकल्प अधिकारी श्री.संजीव कटके, विशाखा शहारे, श्री. तुषार सुर्यवंशी,मिथुन नागवंशी, श्रीमती शितल गडलिंग, श्री.हृदय गोडबोले,प्रकल्प अधिकारी या सह, जिल्ह्यातील समतादुत विभागातील अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages