बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी भैय्यासाहेब आयुष्यभर झटले... -श्रावण गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 December 2021

बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी भैय्यासाहेब आयुष्यभर झटले... -श्रावण गायकवाड

औरंगाबाद : दि.१२ रोजी सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भडकल गेट येथे आंबेडकरी  कार्यकर्ते व नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

ह्यावेळी बोलताना प्रमुख वक्ते श्रावण गायकवाड ह्यांनी बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी मोठे परिश्रम घेत थांबलेला धम्मचळवळीचा रथ गतिमान केला.


चैत्यभूमी च्या स्थापनेसाठी काढलेली भीमज्योत रॅली,स्वतंत्र बौद्ध कायद्यासाठी आमदार असताना उठवलेला आवाज,बौद्धांचे धार्मिक विधी साठी पुस्तक निर्मिती,बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस च्या माध्यमातून बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे ह्या साठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.


राजकीय नेतृत्व म्हणून नव्हे तर एक सच्चा आंबेडकरी अनुयायी म्हणून अत्यंत साधेपणाने ते जगले नव्या पिढीने त्यांनी केलेला त्याग समजून घेतल्यास एक जबाबदार पिढी घडू शकते असे विचार व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना 22 प्रतिज्ञा देण्यात आल्या.


 ह्यावेळी चंद्रकांत रुपेकर,सुशीला खडसे,आनंद कस्तुरे,संतोष मोकळे,प्रा.सिद्धोधन मोरे,सचिन निकम,रुपराव खंदारे,प्राणतोष वाघमारे,दिपक निकाळजे,पवन पवार,सोनू नरवडे,अ‍ॅड.अतुल कांबळे,राहुल खंडागळे,प्रा.प्रबोधन बनसोडे,दिनेश नावगिरे,सोनू भटकर,कपिल बनकर,स्वप्नील गायकवाड,प्रवीण हिवराळे,सचिन शिंगाडे,विकास हिवराळे,सागर प्रधान,सचिन गायकवाड, सतीश शिंदे,मनीष नरवडे,सागर ठाकूर,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,सम्यक सर्पे,अमोल घुगे,ऍड तुषार अवचार,प्रदिप राजगुरे,सोनू पाईकडे,सुबोध जोगदंडे,दीपक जाधव,सचिन जगधने,कैलास काळे,सनी देहाडे,अनिल दिपके,अशोक दाणेकर,गणेश रगडे,सुमित नावकर,अविनाश जगधने,किरण गायकवाड,सोमनाथ वाघमारे,धम्माप्रिया खरात,विजय मिसाळ, आकाश गायकवाड, अक्षय शेजुळ,बादल बनकर, रिपब्लिकन सेना,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, रिपाई (खरात),यंग बुद्धिस्ट  असोसिएशन,रिपब्लिकन पँथर आर्मी,वंचित बहुजन महिला आघाडी,समता सैनिक दल,जेतवन ग्रुप आदी संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Pages