किनवट, दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना ६५ च्यावर रक्तदात्यांनी आज(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान करुन अभिवादन केले.तसेच एक वही एक पेन अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक एड.सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी सांगितले.रक्तदान शिबिराचे हे चवथे वर्ष आहे.
प्रारंभी उपस्थित अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव महेंद्र नरवाडे व गंगाधर कदम यांनी सामुदायिक वंदना घेतली.याप्रसंगी आंबेडकरी विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी,आंबेडकर प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
No comments:
Post a Comment