नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे कार्यरत असलेले
प्रा.डॉ.नितीन व अपर्णा गायकवाड यांच्या मुलांच्या अंश च्या द्वितीय वाढदिवसा च्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जिवन चरिञाचे २४ खंड अध्यासन केंद्राला भेट दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,मा.सुरेशदादा गायकवाड,डाँ.एन.के.सरोदे,
प्राचार्य.डॉ.मुज्जावर सर,डॉ.रवि सरोदे,मा.पी.एस.गवळे,मा.करुणा जमदाडे,काळबा हनवत्ते,तुकाराम हंबर्डे.माधवराव शिरसे,संदीप एडके,डॉ.संदीप जाधव, यांच्या सह ई. ची. उपस्थिती होती.
स्वारातीम.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्या्सन व अभ्यास केंद्राच्या ग्रंथालयात एक लाख पंचविस हजार ग्रंथ/पुस्तसके संकलित करण्यारचा जो संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने डॉ. नितीन गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या द्वितीय वाढदिवसाचे औचित्य साधून २४ पुस्तके भेट दिले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भीम शाहीर प्रा. गौतम पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हाटकर यांनी मानले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment