मुंबई (प्रतिनिधी)देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असला तरी भारतीय समाजातील एक मोठा समाजघटक हक्क व प्रतिष्ठापूर्ण जीवनापासून वंचित आहे. जागतिकीकरनामुळे विषमता तीव्र होत असून जात-वर्ग भेद आणखी खोलवर जात असून अभावग्रस्तता वाढत चाललेली आहे. चित्राच्या व दृश्यकलेच्या माध्यमातून वंचितांच्या समाजजीवनाला दृश्य रूप देण्याचा प्रयत्न करतांना संवेदनशीलता बाळगणे आवश्यक आहे असे प्रतिपादन नामवंत चित्रकार, कवि आणि लेखक सुनील अवचार यांनी लोकवाड्मय गृह आणि प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘वंचितांची प्रतिमादृष्टी’ या चित्र प्रदर्शना प्रसंगी केले.
यावेळी आयोजित केलेल्या परिसंवादात वंचितांची प्रतिमश्रूष्टी ही आनंद देणारी व आल्हाददायक नसून संवेदनशील व्यक्तीला डिस्टर्ब करणारी आहे व मुख्य कला प्रवाहामध्ये unsuitable आहे असे परखड मत सुनील अवचारांनी नोंदवले. सुधारक ओलवे यांनी आपल्या फोटोग्राफीच्या प्रवासावर प्रकाश टाकला. या प्रदर्शनात वंचितांचे समाज वास्तव टिपणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग होता. या प्रदर्शनात सुनील अवचार यांचे वंचितांचे ज्वलंत वास्तव टिपणारे चित्र, पद्मश्री सुधारक ओलवे यांचे देशभरातील जातीय हिंसा दाखवणारे छायाचित्र व अविनाश उषा वसंत यांनी कामगार विश्वाचे काढलेले छायाचित्रांचा समावेश होता. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात अर्जुन डांगळे व अभिजित ताम्हणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची भूमिका डॉ श्रीधर पवार यांनी मांडली. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला आनंद पटवर्धन, कॉ. रेड्डी, प्रा. महेंद्र भवरे, चारू जोशी अशा अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
No comments:
Post a Comment