डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाचे आवेदन पत्र स्विकारण्याची तारीख वाढवून द्या- नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 December 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाचे आवेदन पत्र स्विकारण्याची तारीख वाढवून द्या- नसोसवायएफ

नांदेड; दि २८:

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 चे अर्ज सादर करण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख समाज कल्याण कार्यालय,नांदेड यांच्यख मार्फत प्रसिद्धि पत्रकाद्वारे व वर्तमानपत्राद्वारे समजले आहे. दि.27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा पत्रक टाकल्यामुळे विद्यार्थी हे अडचणीत सापडले आहेत कारण तीन दिवसामध्ये कागदपत्रे कसे जमा करायचे ? हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे.

विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना तहसिल कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी किमान 4-5 दिवसाचा कालावधी लागतो. तर मग विद्यार्थ्यांनी 3 दिवसा मध्ये कागदपत्रे तयार करून अर्ज कसा द्यायचा ? अधिच कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व पालक यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. समाज कल्याण विभागाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित राहतील यात तिळमात्र शंका नाही.

त्यामुळे मा.सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,नांदेड हे विद्यार्थी हिताय निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तीन आठवडे पर्यंत मुदतवाढ द्यावी असे, अन्यथा नसोसवायएफ  तर्फे तीव्र आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) या विद्यार्थी संघटने ने  निवेदन मा.सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,नांदेड यांना दिले आहे.

निवेदनावर अक्षय कांबळे जिल्हा सचिव,

शुभम दिग्रसकर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,

चंद्रकांत गाडे प्रतिनिधी पी.एन. कॉलेज,

श्रेयश राजभोज प्रतिनिधी यशवंत कॉलेज,नांदेड,कुणाल भुजबळ यांच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a Comment

Pages