नांदेड, (प्रतिनिधी)- आगामी जानेवारी महिन्यात नियोजित ३५ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्व तयारीसाठी तीर्थक्षेत्र महाविहार, बावरीनगर दाभड येथे शनिवारी, दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र महाविहर बावरीनगर दाभडचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू शीलरत्न, भिक्खू अश्वजीत, भन्ते बुद्धभूषण व पूजनीय भिक्खू संघाची या बैठकीला उपस्थिती राहणार आहे.
भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार, बावरीनगर दाभड ता. अर्धापूर, जि. नांदेड व नांदेड वासियांच्या संयुक्त विद्यमाने महाविहार, बावरीनगर दाभड, नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येत्या पौष पौर्णिमेस दि. १७ व १८ जानेवारी २०२२ रोजी ३५ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे.
No comments:
Post a Comment