बाबासाहेबांना स्वरांच्या माध्यमातून भीमांजली अर्पण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 December 2021

बाबासाहेबांना स्वरांच्या माध्यमातून भीमांजली अर्पण

मुंबई,  :  महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात बाबासाहेबांना  स्वरांच्या माध्यमातून भीमांजली अर्पण करण्यात आली. 

दरवर्षी हा कार्यक्रम राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात येत असतो. यंदाचे हे सहावे वर्ष.   

यावेळी व्हायलिन  वादक उस्ताद फैयाज खान, सीतार वादक पंडित नयन घोष, बासरी वादक रूपक कुलकर्णी आणि तबला वादक पंडित मुकेश जाधव या  शास्त्रीय संगीतकारांच्या स्वरलहरींच्या माध्यमातून महामानवस आदरांजली वाहिली गेली. भल्या पहाटे उठून सर्व धम्म उपासक उपासिका या कार्यक्रमास हजेरी लावत असतात. हा  कार्यक्रम कोरोना त्रीसूत्रीचे पालन करीत शांततेच्या माध्यमातून पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी समितीच्या सर्व सुपर कोॲार्डीटर व व्हॅालिय्ंटर  यांनी सांभाळली. 

भीमांजली हा कार्यक्रम रा.डॉ.बा.आ.वि.म.समितीचे चीफ कॉर्डिनेटर  उद्योग विकास आयुक्त आय. ए. एस. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत असतो. या कार्यक्रमाला अनेक दिगग्ज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून महामानवास आदरांजली वाहिल्यानंतर एक हजार उपासकांनी रविंद्र नाट्य मंदिर दादर ते  चैत्यभूमी दादरपर्यंत पायी चालत जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Pages