नांदेड येथे जय भीम महोत्सवाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 December 2021

नांदेड येथे जय भीम महोत्सवाचे आयोजन

 नांदेड : वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व रमाई प्रतिष्ठाण, नांदेड द्वारा जय भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . 

सदरील महोत्सव  हा शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुसुम सभागृह (लोकशाहीर विठ्ठल उमप नगरी) नांदेड येथे आयोजित केला आहे.


  महोत्सवाचे उदघाटन ना .अशोक चव्हाण यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरू हे राहणार आहेत. या वेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच डॉ. सूरज एंगडे , सुमित धोत्रे यांना जयभीम आयकॉन पुरस्कार , महाकवी वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार प्रा. रवीचन्द्र हडसनकर यांंच्यासह डॉ.सागर जाधव ,माधवराव गायकवाड,युगेंद्र यशवंते व शाहीर डी. आर.इंगळे  यांना देण्यात येणार आहे.

     

या प्रसंगी  कडुबाई खरात यांच्यासह सुप्रसिद्ध गायकांच्या भीमगीतांचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजन समितीचे सुरेश हटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages