मान्यवरांच्या लेखणीतून उलगडलेले प्रा .अविनाश डोळस सर .....- डॉ. प्रज्ञा साळवे रुईकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 December 2021

मान्यवरांच्या लेखणीतून उलगडलेले प्रा .अविनाश डोळस सर .....- डॉ. प्रज्ञा साळवे रुईकर

   11 डिसेंबर डोळस सरांचा जन्म दिवस .....मागील महिन्यात त्यांचा प्रथम स्म्रुति दिवस झाला .....त्यांच्या स्म्रूतिस विनम्र  अभिवादन .......       नंदनवन कॉलनीतील 'विदिशा ' नावाचे घर     .! या घरा बद्दल मला नेहमीच कुतूहल असायचे ! त्याला कारणही तसेच होते .मला त्या घरात नेहमीच अनेक लोकांची वर्दळ , ये -जा दिसायची , ज्यात अनेक -अनेक प्रकाराची लोक असायची .म्हनजे प्राध्यापक , इंजिनियर , नेते , कार्यकर्ते , साहित्यिक , कलाकार , आशी सगळीच माणसे ....प्रा. अविनाश डोळस ' मिलिंद ' चे मराठी चे प्राध्यापक .आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते , एवढीच ओळख मला त्यांच्या बद्दल होती .मग त्यांच्या घरी एवढी लोक कशी ? आणि ही सगळी माणसे हसत बाहेर निघताना दिसायची

मग माझी उत्सुकता वाढत गेली ...की डोळस सर आहेत कोण ? जें एवढय़ा लोकाना खुश करत असतात ?

आणि पुढे त्यांचा परिचय माझ्यासाठी वाढत गेला .प्रा .अविनाश डोळस म्हनजे एका राजकिय पक्षाचे नेते आहेत , श्रध्येय बाळासाहेब आंबेडकरांचे उजवा हात आहेत ., अनेक राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , लोका सोबत त्यांचे खुप चांगले संबन्ध आहेत .ते ऐक उत्तम वक्ता आहेत , उत्तम समीक्षक आहेत , थोर साहित्यिक आहेत , रंगकर्मी आहेत , महिलांना वडिलकिचा आधार आहेत , असा त्यांचा परिचय पुढे मला होत गेला .                           प्रा .अविनाश डोळस सरांचा ' डोळस ' या गौरव ग्रंथात अनेकांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू सांगितले आहेत .ते वाचत असतांना सर तसेच डोळ्यासमोर छबी तयार होते .प्रा .जयदेव डोळे सरांनी त्यांच्या दिसण्याची राहण्याचा खुप सुंदर शब्दात वर्णन केले आहे ...ते म्हणतांत , ..' तो इथला मराठवाड्यातील नसावा कदाचित , कारण तो ओबड -धोबड नव्हता .धसमूस ळ , बेशिस्त , आणि दलित ही वाट्त नव्हता .त्यांच्यात दलितांच्या सारखा आक्रमक पणा नाही .

बहुधा दलित चळवळी ला सापडलेला तो एखादा दलितेतर चेहरा असावा .चेहरा छान हसरा , म्हणजे कार्यकर्ता असूनही ओंगळ वाढलेली नाही .कपडे असे की बहुधा मुंबई हून आणत असावा ., हेवा वाटावा असा चॉईस !

 -  प्रा डॉ प्रज्ञा साळवे रुईकर

No comments:

Post a Comment

Pages