किनवट,ता.११(बातमीदार) : तालुका विधीसेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने शनिवारी (ता.११) किनवट न्यायालयात आयोजिलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले ६ दिवाणी ,१७ फौजदारी खटले व विविध बँकेचे ४९ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ६६ प्रकरणामध्ये एकूण ६८ लाख १हजार ८५८ इतकी तडजोडीची रक्कम प्राप्त झाली. ही प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. बँकेच्या दाखलपूर्व ४९ प्रकरणामध्ये एकूण २१ लाख ६७ हजार ३४८ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. अनेक प्रकरणे निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे, तर पॅनल सदस्य म्हणून अॅड.निलेश राठोड व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्या पॅनलवर प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे आणि सदस्य म्हणून अॅड.टेकसिंग चव्हाण व अॅड.पंकज गावंडे यांनी काम पाहिले. यावेळी अॅड, अॅड.शंकर राठोड, अॅड.उदय चव्हाण, अॅड.सुभाष ताजने, अॅड.राहुल सोनकांबळे, अॅड. दिलीप काळे,अॅड.आकाश कोमरवार, अॅड. पंजाब गावंडे,अॅड.किशोर
मुनेश्वर, अॅड. सुनील शिरपुरे,
अॅड.उदय चव्हाण,अॅड. कुरेशी, अॅड. एन. यु. मुनेश्वर, अॅड. दिलिप कोट्टावार, अॅड.यशवंत गजभारे, एड.श्रीकृष्णा राठोड, अॅड. संकेत राठोड, अॅड.दिनानाथ दराडे, अॅड.डी.जी.काळे,अॅड.के.एस.काजी, अॅड.एम.यु.सर्पे, अॅड.सुनिल येरेकार, अॅड.गजानन पाटील, अॅड.नेम्मानीवार, अॅड.एस.व्ही.आयतलवाड, अॅड. बिपिन पवार,अनुराग भस्मे,अल्तमश शेख, संतोष ताडपेल्लीवार, राजरत्न मनवर,अरुण माडपेेल्लीवार, किशोर गावंडे, शैलेश आढाव, विनोद झोडे,सारखणी
यांच्यासह विविध बँकेच्या अधिकार्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी एल.वाय. मिसलवार, शाम कुलकर्णी, बी.ए. घुले, एस.व्ही.मोरे, जी.डी. सोनटक्के, कुलकर्णी, धोटे, मगदुम, माने, केंद्रे, नीलवर्ण, कावळे, बारसे, सूर्यवंशी, के.व्ही. आडे, शेख बाबू, तेलंग, शेख शौकत, गौतम जोंधळे, उकंडराव, दोनकलवार, पठाण सहीत न्यायालयीन कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment