किनवट ,दि.११ : सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जेष्ठ नाटककार यादव तामगाडगे गुरुजी लिखित 'क्रांतीसूर्य', व 'रमा',या नाटग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी(दि.१२)सकाळी साडे अकरा वाजता गोकुंदा(ता. किनवट)येथिल महात्मा जोतिबा फुले विद्यालयाच्या मातोश्री कमलताई ठमके सभागृहात संपन्न होणार आहे.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादच्या कौशल्य प्रकाशनाचे डॉ. अशोक गायकवाड, जेष्ठ समिक्षक प्रा.डॉ. प्रकाश मोगले,प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर,प्रा.सुरेश कटकमवार,रामजी कांबळे व प्राचार्या शुभांगी ठमके हे उपस्थित राहणार आहेत.प्रास्ताविक राजा तामगाडगे, सूत्रसंचालन उत्तम कानिंदे व आभार प्रदर्शन रमेश मुनेश्वर हे करतील.प्रारंभी 'आदिजन', संचलित वामनदादा कर्डक संगित अकादमी,गोकुंदा प्रस्तुत "गीते प्रबोधनाची", हा कार्यक्रम सुरेश पाटील व आम्रपाली वाठोरे हे सादर करतील. त्यांना अनिल उमरे,प्रकाश सोनवने,सूरज पाटील व साहेबराव वाढवे हे संगित सहाय्यक करतील. उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजक अनित्य कांबळे,डॉ. विजय कांबळे,महेंद्र नरवाडे, प्रा.डॉ. पंजाब शेरे,रुपेश मुनेश्वर, भारतध्वज सर्पे,भिमज्योत मुनेश्वर व तामगाडगे परिवाराने केले आहे.
No comments:
Post a Comment