डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य महारक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 December 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य महारक्तदान शिबिराचे आयोजन

 नांदेड :

    महाराष्ट्रात दर दिवशी साधारणपणे ४५०० ते ५०००           गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते .सदर बाब विचारात घेता,  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महारक्तदान शिबिर व या दिनाचे औचित्य साधून सामजिक विषयावर भाष्य करनारा जयभीम चित्रपट दाखवण्यात येणार आहे

       कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नये,गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे असे आवाहन  युवा जिल्हाध्यक्ष विक्की वाघमारे यांनी केले आहे.कोरोना महामारीच्या काळात राज्यात   गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी   रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक भान राखत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त  शहरातील डॉ.आंबेडकर नगर (शहीद गौतम वाघमारे चौक)फायर स्टेशन नांदेड जवळ विक्की वाघमारे( युवा जिल्हाध्यक्ष बसपा नांदेड ) यांच्या वतिने सहा डिसेंबर सकाळी 10 वाजता  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   सदरील रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने   रक्तदान करून  सहकार्य करावे असे आवाहन अभिजित कोल्हे, अविनाश शेंडे   यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages