मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 December 2021

मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड- 16 डिसेंबर 2021 :        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा.केंद्रीय कृषी मंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा  वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल पाटील  इंगळे यांच्या तर्फे  फिनिक्स अकॅडमि नवीन मोंढा मगनपुरा नांदेड येथे  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  सराव परीक्षेचे दि.१९ डिसेंबर २०२१ वार रविवार रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व स्पर्धा परीक्षा  विद्यार्थ्यांसाठी मोफत खुला प्रवेश असेंन व यापैकी पहिला,दुसरा व तिसरा क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरिकांसाठी  लसीकरण शिबीर कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड पहिला व दुसरा डोस ,१८ वर्षा वरील सर्वांसाठी मोफत लसीकरण यांचे आयोजन सोबतच मोफत N -95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाचा जास्ती जास्त  विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी  लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

                    या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरजिल्हा उपाध्यक्ष मनोज उर्फ बबलू डोईजड, शहर सरचिटणीस विक्रम ठाकूर , जिल्हाउपाध्यक्ष निनाद काळे,सा.न्या.विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष चैतन्य वाघमारे, ग्रंथालय विभागाचे दक्षिण विधानसभा अध्यक्ष अंकुश शिखरे विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष  अभिषेक पावडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष समर्थ राऊतराव विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अजय हाटेकर युवक जिल्हाउपाध्यक्ष नागेश येजगे,शुभम तायडे ,अजय कदम ,गंगाधर शेळके, सदाशिव पापुलवाड आदी.परिश्रम घेत आहेत.No comments:

Post a Comment

Pages