मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 13 December 2021

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


 मुंबई  - ओबीसी विभाग  माझ्या  सामाजिक  न्याय मंत्रालयात येत आहे. त्यातील आकडेवारीनुसार देशभरातील 80 टक्के  मुस्लिम समाज  ओबीसी प्रवर्गां अंतर्गत येत असून ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत आहे. तरी मुस्लिम समाजाची स्वतंत्र प्रवर्गात आरक्षणाची मागणी आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या स्वतंत्र प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.

सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी साठी आयोजित उत्तर मध्य  मुंबई जिल्ह्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला; राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग; जिल्हा अध्यक्ष विवेक पवार; तानाजी गायकवाड;  श्रीकांत भालेराव; विलास तायडे; एम एस नंदा; सिद्धार्थ कासारे; सुमित वजाळे; घनश्याम चिरणकार  ; श्रीधर साळवे; अमित तांबे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


दलित बौद्धांना आरक्षण मिळत आहे.तसेच दलित ख्रिश्चनांना ही आरक्षण मिळाले पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.


   समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी; समाजात आपुलकी वाढविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करीत आहे. आपआपल्या भागात कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करून  सर्व जाती धर्मीयांची मते मिळवावी. रिपब्लिकन पक्ष संघटनात्मक मजबूत आहे मात्र राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून आणले पाहिजेत त्यादृष्टीने कामाला लागावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे त्याच महामानवाच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पक्ष साकार झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविण्यासाठी संघर्षनायक रामदास आठवले दिवसरात्र काम करीत आहेत. याचा आम्हाला अभिमान असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी करा. मुंबई महापालिका निवडणुकीकडे देशाचे लक्ष असते त्यामुळे आरपीआय चे 25 उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करा असे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी यावेळी केले.


              

No comments:

Post a Comment

Pages