शरद पवारांची थेट संविधानाशी तुलना, एमजीएममध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन ,डॉ. रेखा शेळके यांनी मागितली माफी ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 December 2021

शरद पवारांची थेट संविधानाशी तुलना, एमजीएममध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन ,डॉ. रेखा शेळके यांनी मागितली माफी !

औरंगाबाद : 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर रोजी फेसबुकवर शुभेच्छा देणारी पोस्ट MGM पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रेखा शेळके ह्यांनी टाकली होती त्यात शेळके ह्यांनी "आंबेडकरांचे संविधान तुम्ही" असा उल्लेख करत पवारांची थेट संविधानाशी तुलना केल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप निर्माण झाला होता समाजमाध्यमात ह्या विषयी तीव्र प्रतिक्रिया उमटलेली होती.

त्यामुळे आज आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दुपारी 2 च्या सुमारास एम. जी. एम. चे बाबुराव कदम ह्यांची भेट घेऊन रेखा शेळके ह्यांनी माफी मागावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. तदनंतर समोर येत रेखा शेळके ह्यांनी लेखी माफीनामा देत घडल्या चुकीची माफी मागितली आहे.


कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची तुलना ही महामानव अथवा भारतीय राज्यघटनेशी होऊ शकत नाही त्यामुळे घडल्या प्रकारावर बाबूराव कदम ह्यांनी तात्काळ रेखा शेळके ह्यांना बोलावून घेत घडल्या प्रकाराबाबत जाब विचारला.संतप्त कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता डॉ.शेळके यांनी जाहीर माफी मागितली आहे.


आंदोलनात सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे, बलराज दाभाडे,बाळूभाऊ वाघमारे,मनीष नरवडे,प्रथम कांबळे,राहुल खंडागळे,नवल सूर्यवंशी,अमोल भालेराव,मिलिंद दाभाडे,बंटी नवगिरे,सागर प्रधान,सुबोध जोगदंडे,विशाल बनकर,योगेश म्हस्के, आदी कार्यकर्ते सहभागी होते.


No comments:

Post a Comment

Pages