३५ वी अ. भा. बौद्ध धम्म परिषदे १७ व१८ जानेवारीला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 12 January 2022

३५ वी अ. भा. बौद्ध धम्म परिषदे १७ व१८ जानेवारीला



नांदेड दि. १२ : प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी पौष पौर्णिमेला म्हणजेच दि. १७ व १८ जानेवारी २०२२ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.  ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’ चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे. 

दि . १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वा त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, ८:३० वा महाबोधि वंदना, ९:३० वा धम्म ध्वजारोहण व ९:४० पासून धम्म उपदेश होईल. दुपारी ठीक ३:०० वा. ३४ व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेच्या  उदघाटन समारंभास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत व परिषदेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ठीक ११.३० पासून रात्री १० वाजेपर्यंत पूज्यनीय भिक्खु संघातर्फे निरंतर धम्मदेसणा होईल. 

या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भदन्त अंगुलीमाल महाथेरो, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त बोधिपलो महाथेरो, भदन्त विशुद्धानंद महाथेरो, भदन्त महापंथ महाथेरो, भदन्त प्रज्ञादीप महाथेरो-महासचिव अ. भा. भिक्खु संघ बुद्धगया, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु ज्योतिरत्न थेरो नागपूर, भिक्खु एस. काश्यपायन थेरो-जयसिंगपूर,  भिक्खु विणयबोधिप्रिय थेरो, भिक्खु धम्मानंद थेरो- बिदर, भिक्खु महाविर्यो- अहमदपूर, भिक्खु ज्ञानरक्षित- औरंगाबाद, भिक्खु धम्मशील सारनाथ, भिक्खु बुद्धदत्त बेंगलोर आदी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्म देसणा होईल. 

यावर्षी आयोजित होणा-या ३५ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत कोणत्याही प्रकारची  दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अगर त्याचा प्रसार होऊ नये व अशा संकट समयी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणेदेखील आवश्यक असल्याने सर्व उपासक उपसिकांनी महाविहार बावरीनगर येथे धम्म परिषदेत उपस्थित राहताना प्रशासनाच्या साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages