औरंगाबाद :
जय भीमचे जनक बाबू हरिदास एल.एन.यांची जयंती आजाद समाज पार्टीच्या वतीने भडकल गेट येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर साजरी करण्यात आली.
या वेळी राज्य महासचिव प्रा. सुनिल वाकेकर सर यांनी ही जयंती दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे असे आव्हानं केले.
राज्य मुख्य संघटक सिद्धार्थ शिनगारे सर यांनी बाबू हरदास यांच्या जीवन चरित्राला उजाळा दिला.
या वेळी पवनभाऊ पाखरे मराठवाडा प्रवक्ता, महिला जिल्हा अध्यक्ष शालूताई भोकरे, अरुणभाऊ शिरसाठ, विजयभाऊ वाहुळ, शुभम मगरे, राहुल खंडागळे, अक्षय आव्हाड, हनुमंत पाईक, योगेश शिंदे, आनंद जगताप, अमोल शेजवळ, सचिन तिवारी, आदित्य रगडे, रवी शेजवळ आदी उपस्थित होते.
सूत्र संचालन स्वप्निल घुंबरे पाटील यांनी केले. तर
आभार प्रदर्शन राहुल मकासरे शहर जिल्हा अध्यक्ष यांनी केले.
No comments:
Post a Comment