स्वाधार योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी - शुद्धोधन कापसीकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 January 2022

स्वाधार योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी - शुद्धोधन कापसीकर

नांदेड : 

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत जो विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असून महानगरपालिका हद्दीत शिक्षण घेत असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. परंतु यावर्षी शासनाच्या वतीने या नियमात बदल करण्यात आला असून जो विद्यार्थी तालुकास्तरावर शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे, परंतु याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी हे तालुक्याच्या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत, त्यांना रूम भाडे, मेस भाडे, शैक्षणिक साहित्यासाठी लागणारा खर्च अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

      तरी जो ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुकास्तरावर शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तालुकास्तरीय अर्ज भरण्याची प्रक्रियेची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु करुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवा नेते शुद्धोधन कापसीकर यांच्यावतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages