नांदेड (जय भोसीकर) :
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक १ फेब्रुवारी रोजी जाहीर होऊ शकते असे संकेत मा. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने देण्यात आले.
१५ जानेवारी पासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने स्पर्धेच्या दोन दिवस आधी पुढे ढकलल्याचे कळवले त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी हौशी रंगकर्मीची निराशा झाली. त्या सर्व रंगकर्मींनी एकत्र येत सांस्कृतिक कार्य संचालनालयात ई मेल द्वारे आपली निराशा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. सर्व रंगकर्मींचा रोष पाहता आणि प्रशासनाची बाजू लक्षात घेऊन नांदेड केंद्रावरील समन्वयक, रंगकर्मी दिनेश कवडे यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रंगकर्मींमध्ये समेट घडवत दि.१८ जानेवारी रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद घडवून आणला. या प्रसंगी बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, सह संचालक श्रीराम पांडे, अधीक्षक मिलिंद बिर्जे ( नाट्य विभाग ) यांची उपस्थीती होती. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध केंद्रावरील रंगकर्मींनी संचालकांशी संवाद साधला. सर्व रंगकर्मींच्या वतीने डॉ. श्याम शिंदे (अहमदनगर) यांनी प्रस्तावना केली. सलीम शेख (नागपूर), अजय धवणे (अकोला, अमरावती, चंद्रपूर), प्रताप सोनाळे (सांगली, सातारा, मिरज ), संजय पांडे (नांदेड, परभणी, लातूर ), डॉ. विनोद निकम (बीड, अंबेजोगाई), डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर), प्रणव जोशी (पुणे),निलेश आवटी (कोल्हापूर), सतिश लोटके (अहमदनगर), अशोक हंडोरे (मुंबई, कल्याण, ठाणे) यांनी आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करत शासन दरबारी आपले मुद्दे नमूद केले. यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत संचालक विभीषण चवरे यांनी सर्वांच्या मुद्द्यावर समर्पक बोलत येत्या ३१ जानेवारी पर्यंत आढावा घेऊन १ फेब्रुवारी रोजी नवीन वेळापत्रक जाहीर होऊ शकते असे सूचक उत्तर देत रंगकर्मींनी तालीम सरू ठेवावी असे सांगीतले. स्पर्धा होणार या आश्वासनामुळे रंगकर्मींमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला. या संवादाचा समारोप रंगकर्मी सलीम शेख यांनी केले.
No comments:
Post a Comment