संस्कृतभाषा मराठीची जननी नव्हे तर मारेकरी ! -प्रा.डॉ.सिध्दोधन कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 January 2022

संस्कृतभाषा मराठीची जननी नव्हे तर मारेकरी ! -प्रा.डॉ.सिध्दोधन कांबळे

 देशभरातील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषाअभ्यासकांना व मराठीचा अभिमान जिवंत ठेवणार्या माणसाना मी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या' निमित्त शुभेच्छा देतो नि आवाहन करतो की,मराठी भाषेचे संवर्धन व तिला मुक्त करण्यासाठी आपल्याला मोठे अभ्यास आंदोलन उभारावे लागेल.


मराठी भाषेला संस्कृतभाषेने हजारों वर्षापासून जख्मी करुन ठेवले आहे.तिचे जनकत्व हिरावून घेतले आहे.मराठी ही स्वतंत्र भारतीय भाषा असतांना.तिला स्वतःचा स्वाद-गंध,लय नि अर्थ असताना देखील तिचे मातृत्व नि नेतृत्व संस्कृत पंडितानी हिरावून घेतले.मराठी भाषा ही हजारों वर्षापासून संस्कृतभाषेच्या जोखडात नि जाचात राहिल्याने तिचे अस्तित्व नष्ट झाले.


'संस्कृतभाषा ही मराठीभाषेची जननी आहे' असा खोटा इतिहास लिहून मराठी भाषेवर अधिराज्य गाजवणार्यानीच मराठीभाषेला नि मराठी माणसाना संपविण्यासाठी कटकारस्तान रचले.मराठी माणसांवर शिक्षणबंदी लादून मराठीशब्दाना संस्कृतभाषेतील शब्दांचे पर्याय दिले.मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधु मानला गेला.९ व्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या खाणाखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला.महानुभाव संप्रदायाची मराठी परंपरा बोथट करण्याचा अविरत प्रयत्न झाला.मराठी भाषेवर कायम प्रभत्व गाजवून महाराष्ट्राची सम्यक मानवतावादी परंपरा नष्ट करण्यासाठीच मराठीभाषेवर संस्कृतभाषिकांनी आक्रमण केले.षडयंत्र रचले.

मराठी भाषेचे उगमस्थान हे संस्कृतभाषा जन्माला येण्यापुर्वीचे आहे.याला भक्कम पुरावेही आहेत.भारतीय पालीभाषा हीच खरी मराठी भाषेची जननी आहे.कारण पालीभाषेतील स्वर-व्यंजने,वर्णमाला आणि मराठीभाषेतील स्वर-व्यजंन,वर्णमाला एकसारखी आहे.

याचा अर्थ मराठीभाषा ही पालीभाषेचे अपत्य आहे,संस्कृतभाषेचा नि मराठीभाषेचा अर्थाअर्थी संबध नाही.त्या एककुलीन भाषा नाहीत.


मराठीभाषेचे अभ्यासक म्हणून खालील संदर्भ समजून घेतल्यास मराठीभाषेचे महत्व आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात येईल.


'तक्षशिला' हे जगातील पहिले विद्यापीठ भारतात होते,याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे.त्याचप्रमाणे जगाला ज्ञान नि विज्ञान शिकवणारी पहिली जागतिक भाषा ही पालीभाषाच होती याचाही गर्व वाटतो.

हजारों परकीय विद्यार्थ्यांनी पालीभाषेतून शिक्षण घेऊन जगाला समृद्ध केले.जगाच्या उच्चशिक्षणाचे व समृद्धशाली विकासाचे उगमस्थान पालीभाषेत आहे,अभिमानाची बाब म्हणजे पालीभाषाही जगाची ज्ञानभाषा होती व ती भारतीयभाषा आहे !

हे पुढील संदर्भ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल.


तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण आणि संस्कार घेतलेल्या काही महान जगनिर्मात्या विद्यार्थ्यांची यादी मी आपल्या आभ्यासासाठी देत आहे.


१) रोममधील ज्यू धर्माचा संस्थापक मुसामौजेस

२) ख्रिश्चन धर्मसंस्थापक यशु-जिजस

३) इस्लाम धर्मसंस्थापक मुहम्मद पैंगबर

४) सम्राट चंद्रगुप्त मौर्या

५) सम्राट अशोक

६) संस्कृतभाषेचे पहिले व्याकरणकार पाणीणी

७) सम्राट बिंबिसार

८) शल्यविशारद जिवक

९) पंचतंत्रकार विष्णु शर्मा

१०) आयुर्विज्ञानाचा तत्त्ववेत्ता महर्षि चरक

११) विज्ञानशाखेचा पहिला अभ्यासक सुश्रुत

१२) खगोलशास्त्रज्ज्ञ वराहमिहिर

१३) शिल्पविद्याशास्त्राचा जनक,ज्याने जगातील पहिली बुद्धमुर्ती बनवली ते कण्हदिन्न

१४) पहिला राजनीतिज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ चाणक्य

१५) योगाभ्यासक पतंजलि


वरील संदर्भ वाचून 'तक्षशिला' विद्यापीठाचे महात्म्य नि त्या विद्यापीठातील ज्ञानभाषेचे महात्म्य आपल्या लक्षात आलेच असेल.यावरून हे स्पष्ट होते की,संस्कृतही एका असंस्कृतसमुहाची भाषा होती तिच्यावर संस्कार करून 'पाणीणी' या पालीभाषेच्या अभ्यासकाने तिचे व्याकरण तयार केले. त्यासाठी 'पाणीणी' याने पालीभाषेतील स्वर-व्यंजनांचा,वर्णमालेचा वापर करत अर्थांतर करुन, अर्थसंकेत बदलून घेतले.

या संदर्भांचा विवेकपूर्ण अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की,मराठी भाषाही संस्कृतभाषेच्या जन्मापूर्वीपासूनच भारतदेशाच्या विविध प्रांतात अस्तित्त्वात होती.तसे अनेक संदर्भ आज घडीत "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिलावा" यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या आहवालातही पाहता येतील. 

शासनाला कुसूमाग्रजांचा जन्मदिन महत्त्वपूर्ण वाटतो परंतु मराठीभाषेचा अभिजात दर्जा नाही ! या पाठीमागचे राजकारण आणि अधार्मिक षडयंत्र कुणाच्याही लक्षात येत नाही,असे नाही.परंतु काही मराठीभाषेच्या लाभार्थी अभ्यासकांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.तर काही अभ्यासकांचे अज्ञानही यातून उघड होते.


मराठी भाषा ही इंग्रजांच्या जागतिक भाषेमुले आडचणीत आली नसून ती संस्कृतभाषेमुले भ्रष्ट झाली.हे समजून घेतले पाहिजे.


सर्व मराठीभाषिक आणि मराठीभाषेचे अभ्यासक हे जाणतात की,मराठीभाषेचे व्याकरण नव्हे तर शुध्दिकरण करणे गरजेचे आहे.प्रश्न हा आहे की,भाषा भ्रष्ट कुणी कली? अशुद्ध कुणी केली ? तिला बंधिस्त कुणी केले? तिला ज्ञानभाषा बनण्यापासून कुणी रोखले? यावर कोणताही मराठी अभ्यासक बोलायला देखील तयार नाही,लिहिणे नि त्यासाठी मराठीभाषा मुक्तीआंदोलन उभारणे ही दुर्लभ घटना बनली आहे.महाराष्ट्राच्या मराठीभाषेत एवढी शक्ति आहे की तिने काही राजकीय पक्षांना सत्तारूढ केले.तर आजही काही पक्षांची रोजी रोटी मराठीभाषेवर चालते.परंतु मराठी बोलणारा माणुस अप्रत्यक्ष रित्या मराठीभाषिक असल्याची शिक्षा भोगत आहे.याची जाणीव ठेऊन मराठीभाषेला संस्कृतभाषेच्या अधार्मिक जोखडातून मुक्त करावे लागेल.तरच तिचे संवर्धन होईल आणि मराठीभाषा ज्ञानभाषेचे लेणे निसवू शकेल...


                   -      प्रा.डॉ.सिध्दोधन,बिलोली

                          ९४२०६७१७५०

No comments:

Post a Comment

Pages