आंबेडकरी चळवळीचा शिलेदार.. सचिन निकम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 January 2022

आंबेडकरी चळवळीचा शिलेदार.. सचिन निकम
   सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडणारे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी  लढणारे,रस्त्यावरची लढाई लढून प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देणारे, आंबेडकरी चळवळीतील कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजेच सचिन निकम..औरंगाबाद हे ऐतहासिक शहर आहे त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भुमी आहे या भूमीत अनेक हिरे तयार झाले त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे सचिन निकम बाबासाहेबांचा विचार घेऊन आपले यशाचे शिखर गाठण्यास सज्ज असणारे आपल्या बुध्दी चातुर्याने स्वतःचे अस्तित्व निर्माण करत चळवळीत आपली वेगळी चुणूक दाखवून चळवळीचा खरा शिलेदार बनणारे एक अस्सल कृतिशील व्यक्तिमत्व  चळवळ असो की राजकारण आज बोलणाऱ्यांची  कमी नाही पण कृतीत मात्र कमी ,असे लोक आज आपणास पाहण्यास मिळतात.प्रत्येक व्यक्ती आज स्वतचं असं जग निर्माण करु इच्छिते प्रत्येकाला त्याचा उद्धार करुन घ्यावासा वाटतो परंतु ज्या महामानवाने त्यांच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले त्याच महामानवाच्या कार्याला त्यांच्या संदेशास आपल्या पिढीला विसर पडत चाललेला आहे की काय ही शंका आज निर्माण होते.एक पिढी निर्माण करण्यासाठी कित्येक पटीचे वैचारिक बळ लागते . त्यासाठी वैचारिक अधिष्ठान असावे लागते. बाबासाहेबांच्या नंतर या पिढ्या निर्माण झाल्या त्यांचा विचार घेऊन अनेक तरुणांनी त्यांच्या चळवळीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यातलाच हा शिलेदार 
किती ही अडचणी आल्या तरी न डगमगता निष्ठेने इमाने इतबारे काम करुन ही चळवळ चालू ठेवन्याची त्यांची निष्ठा यातून दिसून येते. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो हे कळले की माणूस आपली सर्व शक्ती बुद्धिमत्ता हिचा वापर यासाठी करतो .  स्वतःच स्वतःशी प्रामाणिक राहून आपले वैचारिक बळ या सत्कार्यासाठी लावणे ही त्यांची शैली दिसते . प्रामाणिकता, स्वाभिमान, निस्वार्थीपना ही बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वातुन दिसते. त्याबरोबरच सामजिक जाणीव आणि समाजाविषयी आणि डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीविषयी केवळ आपुलकी नाही तर ती बळकट झाली पाहिजे यासाठी सर्वच पातळीवर ते नेहमी एक पाऊल पुढं टाकत त्या कार्यास पुढे नेत आहेत 
मी काहीतरी केलं आहे किंवा करतो आहे या अविर्भावात ते बाळगत नाहीत मी करतो ते माझे कर्तव्य आहे ही त्याची प्रामाणिक भूमिका  हेच त्यांचे वेगळेपण सिद्ध करते . अतिशय नियोजनबद्ध काम करण्याची त्याची कार्य पद्धत अनेक तरुणांना प्रेरणादायी आहे. अनेक सामाजिक कार्य ते आपल्या हातून पार पाडत असतात नागसेन फेस्टिवल  यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सांस्कृतिक चळवळ सुध्दा मजबूत करतात.अश्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला जन्मदिनानिमित्त हार्दिक सदिच्छा.. 

- निलेश वाघमारे..
8180869782 नांदेड

No comments:

Post a Comment

Pages