सावित्रीमाईने हातात लेखणी दिली अन् महिला बोलू-लिहू लागल्या - रमेश मुनेश्वर ; शाळेत केला सन्मान सावित्रीच्या लेकींचा ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 4 January 2022

सावित्रीमाईने हातात लेखणी दिली अन् महिला बोलू-लिहू लागल्या - रमेश मुनेश्वर ; शाळेत केला सन्मान सावित्रीच्या लेकींचा !

किनवट ( प्रतिनिधी ) :

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समर्पक कार्याला तोड नाही. खांद्याला खांदा लावून शैक्षणिक, सामाजिक कार्यात महात्मा फुलेच्या त्या सोबत होत्या. सावित्रीमाईने हातात लेखणी दिली अन महिला बोलू- लिहू लागल्या असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले.


लोणी येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ते बोलत होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थिनीने स्वागतगीत गायले. सावित्रीबाईची वेशभुषा केलेले शाळेतील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे आणि नाटिका सादर केली. 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजलेल्या सावित्री ते जीजाऊ जयंती निमित्त ३ ते १२ जानेवारी सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानांतर्गत आणि शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या आवाहनाला साद देत शाळेतील  महिला शिक्षिकेचा व अंगणवाडी सेविकांचा पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला. 


यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षिका शाहिन बेग यांनी केले तर आभार उपक्रमशिल शिक्षिका विद्या श्रीमेवारनी केले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदा सावरकर यांच्यासह बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages