नांदेड :- मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोमवारी नांदेड शहरातील कच्छवेज गुरुकुल स्कूल म्हाडा नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दुर्गादेवी कच्छवे तर प्रमुख पाहुण्या म्हणून इतवारा उपविभाग नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक दामिनी पथक प्रमुख सौ. प्रणिता बाभळे -शिंदे या उपस्थित होत्या सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक दामिनी पथक प्रमुख सौ. प्रणिता बाभळे -शिंदे यांनी मुलीना असा संदेश दिला कि या इंटरनेट जगात वावरताना मुलींनी अनोळखी व्यक्ती सोबत संवाद साधू नये. आपल्या घरातील काहीही सांगू नये. ऑनलाईन क्लास च्या नावाखाली विविध प्रकारच्या सोशल मीडिया साईट भेट देऊ नये.आपले पूर्ण लक्ष अभ्यासाकडे देऊन आपल्या आई -वडिलांचे स्वप्न साकार करावे व आजच्या युगात मी मुलगी नसून मी मुलगाच आहे अशी धमक निर्माण करावी असे मार्गदर्शन केले
‘मुलगी वाचवा, देश वाचवा’, ‘बेटी है तो कल है’, ‘बेटी बचाओ’, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका सौ. शिल्पा कतेवर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. मीरा बाचेवाड, सौ. शिला अनंतवार व सेविका अशा ठाकूर, मंगल बुरडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment