कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 January 2022

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले अभिवादन

 


पुणे, दि. १ : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.


यावेळी ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ ऐतिहासिक आहे. या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करताना मला विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा  स्तंभ शौर्याचे प्रतीक असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असेही डॉ. राऊत म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages