माजी नगरसेवक प्रकाश नगराळे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 January 2022

माजी नगरसेवक प्रकाश नगराळे यांचे निधनकिनवट, ता.१ : सिद्धार्थ नगरातील रहिवासी,फुले-आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता व माजी नगरसेवक पँथर प्रकाश रामभाऊ नगराळे (वय६०)यांचे काल (ता.३१)रात्री अल्प आजाराने निधन झाले.

   त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा, दोन विवाहीत मुली,सुन,जावई,भाऊ,बहीनी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या  पार्थिवावर आज(ता.१)दुपारी दोनच्या सुमारास शांतीभूमी बौद्ध स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे त्यांच्या पुढकारातूनच शांतीभूमी या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावेळी समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages