मुंबई दि.2 - मिसेस मेस्मरीक क्वीन इंडिया 2021 या Pराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्यस्पर्धेत मुलुंड मधील सौंदर्यवती सौ.प्रियांका सिद्धार्थ थोरात यांनी चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक मिळवीत उपविजेती होण्याचा बहुमान मिळविल्या बद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सौ.प्रियांका सिद्धार्थ थोरात यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना पुढील वर्षी प्रथम क्रमांक मिळविण्याच्या शुभेच्छा आशीर्वाद दिले आहेत.यावेळी सौ प्रियांका थोरात यांचे पती सिद्धार्थ थोरात; प्रियांका यांची बहीण रश्मी गायकवाड ; प्रणिता गायकवाड; भाऊ संदीप गायकवाड आणि उमेश खरात उपस्थित होते.
उद्या दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जयंती दिन असून सर्व क्षेत्रातील महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्त्री मुक्ती चळवळीतील योगदान स्मरणात ठेऊन त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन नारामदास आठवले यांनी यावेळी केले.
सौंदर्यस्पर्धेत उपविजेता ठरलेल्या प्रियांका थोरात याही स्वतःला अभिमानाने बौद्ध युवती मानत असून माता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन काम करतात. सर्व महिलांनी माता सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घ्यावा असे सौंदर्यवती प्रियांका थोरात यांनी म्हंटले आहे. नोकरी करून संसार सांभाळून राष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत यश मिळविल्या बद्दल सौ प्रियांका थोरात यांचे मुलुंड परिसरात अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment