आशिष नाईक यांच्या नावाला जि.प.उमरी (बा) गटातील मतदारांची पहिली पसंती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 27 February 2022

आशिष नाईक यांच्या नावाला जि.प.उमरी (बा) गटातील मतदारांची पहिली पसंती

किनवट:-

येत्या काही दिवसांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगू लागले आहे, त्याच चर्चे मधील जिल्हा परिषद उमरी (बा) गटातून सर्वसामान्य कष्टकरी व तरुणाईच्या चर्चेतून येत असलेला नाव म्हणजे उच्चशिक्षित,युवा तरुण तडफदार,प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला श्री.आशिष केवलसिंग नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागल्याचे  दिसून येत आहे, श्री.आशिष नाईक यांच्या नावाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे हा तरुण उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अत्यंत अल्पावधीतच त्याच्या मनी असलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर परिसरात युवकांची चांगली फळी निर्माण केले असून त्यासोबतच मागे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक २००७ मध्ये श्री. आशिष नाईक यांच्या मातोश्री सौ. सुनीता केवलसिंग नाईक राठोड यांनी मतदारसंघात प्रचंड मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करिता प्रयत्न केले होते आणि पक्ष श्रेष्ठीमार्फत सुद्धा त्यांनाच उमेदवारी निश्चित असल्याचे दुजोरा देऊन त्यांना जोमाने कामाने लागण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले होते परंतु अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षांतर्गत निर्णयानुसार येनवेळी त्यांना उमेदवारी न देता श्री.रमेश राठोड ,सिंदगी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता पक्षाला ही आपली जागा मोठ्या मताधिक्याने गमवावी लागली होती तसेच श्री. आशिष नाईक यांच्या परिवाराने आपल्याला उमेदवारी नाही दिले याचा कुठलाही द्वेष मनात न ठेवता पूर्ण ताकदीनिशी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर पने उभे राहून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले त्यांनतर हि मागील अनेक वर्षापासून श्री.आशिष नाईक हे  मा.आ.प्रदिपजी नाईक यांच्या सोबत राहून एक तरुण नेतृत्व म्हणून आपले कार्य अविरत चालू ठेवले या सर्व गोष्टींचा सहानुभतीपूर्वक विचार करून आरक्षण सर्वसाधारण पुरुष आले तर श्री.आशिष नाईक यांनाच मा.आ.प्रदिपजी नाईक तरुण नेतृत्व म्हणून संधी देणार असे जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत..

या सर्व चर्चाबाबत आमचे प्रतिनिधी श्री.आशिष नाईक यांच्या सोबत बातचीत केले असता,मा.आ.प्रदीपजी नाईक यांचा विचार मनी घेऊन मी साहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने १९९८ म्हणजेच नाईक साहेब जेव्हा पासून राजकारनामध्ये सक्रिय झाले तेव्हा पासूनच माझे कुटुंबीय एकनिष्ठतेने मा.आ.नाईक साहेब यांच्यासाठी कार्य करत असून मी सुध्दा साहेबाच्या मार्गदर्शनखाली माझे कार्य सुरू केले,येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणूकिमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून आदरणीय नाईक साहेबांनी  

मला उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्यास संधी उपलब्ध करून दिल्यास त्या निर्णयाचे स्वागत करीत मी नक्कीच नाईक साहेबांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद,उमरी (बा) या गटा मधून  पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages