आमदार निधीतून विकास कामाचा धडाका ; माहूर किनवट तालुक्यातील अधिकांश वाडी तांडा मध्ये रस्त्यांना मंजुरी... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 27 February 2022

आमदार निधीतून विकास कामाचा धडाका ; माहूर किनवट तालुक्यातील अधिकांश वाडी तांडा मध्ये रस्त्यांना मंजुरी...

माहुर,ता.27(प्रतिनिधी)

आमदार भीमराव केराम प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने घरी राहूनच आराम घेत आहेत.तरी मात्र त्यांचा विकास कामाचा ओघ काही ओसरलेला नाही.स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत किनवट आणि माहूर तालुक्यातील अधिकांश तांडे, वाडी व पाड्यांमध्ये अंतर्गत रस्ते,सभामंडप मंजूर करण्यात आले असून आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.


कोरोना आजाराचा प्रादुर्भाव ओसरल्या नंतर आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्यक्ष कामांना सुरवात झाली असून किनवट विधानसभा मतदारसंघातील तांडे,वाडी व पाडा येथील अंतर्गत रस्ते,सभामंडप आदी कामे प्रस्तावित केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव सध्या आराम घेत असलेले आमदार भीमराव केराम यांच्या विकास कामाचा ओघ सुरू असून दोन्ही तालुक्यातील विकास कामाचा पाठपुरावा,नागरिकांच्या समस्या आमदार जन संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविले जात आहे.आमदार भीमरावजी केराम यांचे स्थानिक विकास निधीतून मौजे भोरड येथे  सीसी रोड रस्त्याचे भूमिपूजन स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांचे हस्ते करण्यात आले 

यावेळी सरपंच सौ.अनिता जनार्धन धुर्वे,ग्रामसेवक आलनेताई, कुलदीप घोडेकर, ग्रा.पं. सदस्य राजू प्रल्हाद राठोड, श्रीकांत घोडेकर, चंदन पवार,संतोष आड़े ,किशोर राठोड, रघुनाथ धुर्वे, विलास बावने, धर्मा राठोड, जनार्धन धुर्वे,उत्तम धुर्वे,दशरथ राठोड,,किशोर पवार,प्रकाश आत्राम,सुभाष कोहोद,शेख इब्राहिम  सह गावकरी उपस्थित होते.दरम्यान 

आमदार निधीतून अनेक खेडे गावात लवकरच विकास कामांचे भूमिपूजन करून कामे सुरु होणारअसल्याची माहीती यावेळी स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांनी दिली.No comments:

Post a Comment

Pages