कुंडलवाडीत
जयवर्धन भोसीकर :
येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात शिकणारा विद्यार्थी आर्यन शारवाले हा शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत सर्वप्रथम आलेला आहे. तर याच शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थीनी कु.अश्विनी नागनाथ हूंडेकर ही रांगोळी स्पर्धेत सर्व द्वितीय आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंडलवाडी येथे काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त व्याख्यान, रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत येथील मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयाचा इयत्ता सहावी वर्गात शिकणारा विद्यार्थी आर्यन शारवाले हा निबंध स्पर्धेत तर कु.अश्विनी नागनाथ हूंडेकर ही रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतले होते. आर्यन शारवाले हा निबंध स्पर्धेत जाणता राजा शिवाजी महाराज या विषयावर उत्कृष्ट पणे निबंध लिहून सर्वांची मने जिंकून घेतला व त्याला सर्व प्रथम पारितोषिक मिळाले. तर कु.अश्विनी नागनाथ हूंडेकर ही खूपच सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतली आणि तिला रांगोळी स्पर्धेत सर्व द्वितीय पारितोषिक मिळाले. सदरील पारितोषिक काल सायंकाळी बक्षीस वितरणाच्या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. बक्षिसाचे स्वरूप समृती चिन्ह आणि प्रमाणपत्र होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पांचाळ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यु. एस .राठोड यांच्यासह दोन्ही विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्यन शारवाले व कु.अश्विनी नागनाथ हूंडेकर हिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment