भाजपातर्फे जनहितार्थ ई-सेवा केंद्राची स्थापना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 February 2022

भाजपातर्फे जनहितार्थ ई-सेवा केंद्राची स्थापना

किनवट,दि.02 (प्रतिनिधी) :  माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये येथील भाजपा तर्फे ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये नागरीकांना लागणारे विविध दाखले ना नफा ना तोटा या तत्वावर पुरवली जाणार असून, त्याचे संचालन भाजपाचे कार्यकर्ता व विद्यार्थी परिषद चे विद्यार्थी करणार आहेत.


     यामध्ये सद्यस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली ई-श्रम कार्या ची नोंदणी मुख्यत्वे केली जाणार आहे. ज्यामध्ये भविष्यात आधार दुरुस्ती, मतदान कार्ड नोंदणी यांच्या सह विविध नागरी दाखल्यांच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.


        या निमित्त शनिवारी (दि.29) आयोजित कार्यक्रामामध्ये बोलतांना भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले की, भाजपा हा एक विचार आहे. ज्यामध्ये लोककल्याण हा महत्वाचा भाग असून, भाजपामध्ये नेतृत्व करण्याची आवश्यकताच नसते; तर भाजपाची ध्येय-धोरणांसंबंधी जो विचार आहे तो जरी सर्व कार्यकर्त्यांनी अंगिकारून  लोकहितासाठी निरंतर काम करत रहावे, असे मार्गदर्शन विविध ज्येष्ठ पदाधिकार्‍यांकडून केले गेले.


  यावेळी मंचावर भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणिस सुधाकर भोयर, भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, ज्येष्ठ सदस्य राघु मामा, अजय चाडावार यांची  उपस्थिती होती.  या कार्यक्रमात अशोक चिन्नावार, संतोष चनमनवार, सतीश बिराजदार,  युवा आघाडीचे उमाकांत कराळे, वि.हिं.प चे  शिवराज चाडावार, सुनिल मच्छेवार,  शिवा आंधळे, पंकज माडपेल्लीवार,  नरेंद्र सिरमनवार, शिवा क्यातमवार, राजेंद्र भातनासे,  बाबू उटलावार, गजानन शिवनकर, जगदीश तिरमनवार, निखील कावळे, सतिष नेम्मानिवार, बालाजी धोत्रे,   गौरव इटकेपेल्लीवार, संतोष सिरमनवार, संतोष मरसकोल्हे, राहूल दग्गुलवार, आकाश भंडारे, देवराव कोम्मरवार, सुनिल मच्छेवार, संजय धोबे, साई नार्लावार, साई नेम्मानिवार, , गौरव इटकेपेल्लीवार, साई येलेश्वरवार, सम्राट सर्पे, दिनेश नगरुलवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कोल्हारिकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण कदम यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जयराज वर्मा, वैभव सिरमनवार, नरसिंग तक्कलवार आदींनी परिश्रम घेतले.


दरम्यान रजनीकांत राईचंवार, विनायक ठोंबरे, विकास जाधव, अंकुश पेन्शनवर, शिवा तोटावार, राजू कलकुंटलावार यांना  ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या वाढदिवसा निमित्त किनवट शहरात समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केले.

No comments:

Post a Comment

Pages