आंबेडकरी नेते अ‍ॅड.भाई विवेक चव्हाण ह्यांच्या विरुद्ध गरळ ओकणाऱ्या अजय सेंगर विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 1 February 2022

आंबेडकरी नेते अ‍ॅड.भाई विवेक चव्हाण ह्यांच्या विरुद्ध गरळ ओकणाऱ्या अजय सेंगर विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीऔरंगाबाद :

भारतीय दलित कोब्रा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.भाई विवेक चव्हाण ह्यांच्या वर रासुका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करून गरळ ओकणाऱ्या करणी सेनेच्या अजय सेंगर विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटक करून कारवाई कारवाई अशी मागणी आज आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त ह्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे निवेदनाची प्रत मुख्यमंत्री सचिवालय द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.


आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना सामाजिक जीवनातून बाजूला करण्यासाठी मनुवादी प्रवृत्तीचे काही लोक त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत आंबेडकरी कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाहीत ह्यासाठी राजभर उठाव करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.


ह्यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक श्रावण दादा गायकवाड, आनंद कस्तुरे,दिपक निकाळजे,आनंद बोर्डे,प्रा.सिद्धोधन मोरे,बलराज दाभाडे,बाळू वाघमारे,काकासाहेब गायकवाड, नवल सूर्यवंशी,पवन पवार,गुणरत्न सोनवणे,अ‍ॅड.अतुल कांबळे,विकास रोडे,राहुल खंडागळे,मनीष नरवडे,कपिल बनकर,सचिन शिंगाडे,सुबोध जोगदंडे,सम्यक सर्पे,रोहित शिंदे,स्वप्नील बोर्डे,धम्मा रगडे,संतोष निकाळजे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages