बुद्धभूमी मावसाळा जि. औरंगाबाद येथे 22व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचेआयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 February 2022

बुद्धभूमी मावसाळा जि. औरंगाबाद येथे 22व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचेआयोजन


 औरंगाबाद: विश्वशांती बुद्ध विहार मावसाळा ता.खुलताबाद जि. औरंगाबाद येथे 22 व्या विशाल बौद्धधम्म परिषदेचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत प्रा.सुमेधबोधी महाथेरो (अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्यप्रदेश),तर उदघाटक म्हणून पूज्य भन्ते इंदवन्स (महाथेरो) कुशीनगर उत्तरप्रदेश,धम्म ध्वजरोहन पूज्य भन्ते उपगुप्त (महाथेरो) पूर्णा तसेच आदरणिय बौद्ध भिक्खू संघ मोठ्याप्रमाणावर उपस्थितराहुन धम्मदेसना देणार आहेत तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.ह.नी. सोनकांबळे हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.प्रमुख अतिथी मा. खा. चंद्रकांत खैरे,आमदार संजय सिरसाठ,आमदार प्रशांत बंब, सुधाकर बनाटे (सेवानिवृत्त उपसंचालक) शिक्षण विभाग औरंगाबाद, ऍड.एस.आर.बोदडे, संजय पवार लेखापाल मनपा औरंगाबाद आदी मान्यवर राहणार उपस्थित आहेत. या 22 व्या विशाल बौद्धधम्म परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या व भिक्खू संघ यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या धम्म परिषदेचे विशेष आकर्षण म्हणजे भगवान बुद्धाच्या अस्थी कलशाचे वंदन करण्यासाठी सर्वांना लाभ होणार आहे समता सैनिक दल डिव्हिजन औरंगाबादच्या वतीने भ. बुध्दाच्या अस्थिकलशाला आणि महाधम्म ध्वजाला मानवंदना देण्यात येईल. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी 5 ते 6 ध्यानसाधना,6 ते 7 भिखू संघाचा अल्पपोहार,7ते 8:30 बुद्धवंदना,परित्राण, व सूत्तपठण,9:30धम्म ध्वजारोहन,9:30 ते 10:30 धम्मरॅली,10:30ते 1130भिखू संघांचे भोजन दान तर दुपारी 12 वाजता धम्म परिषदेचे उदघाट्न करण्यात येणार असल्याचे मुख्यआयोजक पूज्य भदंत एस.प्रज्ञाबोधी ( महाथेरो ) भन्ते सागरबोधी , भदंत करुणाबोधी , भंते शंतिरत्न यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages