डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. सुदाम राठोड, मिलिंद जाधव आणि सुनीता भोसले यांच्या पुस्तकांना परिवर्तन साहित्य पुरस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 22 February 2022

डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. सुदाम राठोड, मिलिंद जाधव आणि सुनीता भोसले यांच्या पुस्तकांना परिवर्तन साहित्य पुरस्कार

बुलढाणा :

 समाज परिवर्तनाचा विचार आपल्या लिखाणाच्या केंद्रस्थानी ठेवून लेखण करणाऱ्या साहित्यिकास पाठबळ मिळावे यासाठी या वर्षापासून प्रथमच परिवर्तन साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून त्याची घोषणा आज करण्यात आली.

     स्मृतीशेष कवी दिनकर साळवे परिवर्तन साहित्य पुरस्कार (वैचारिक) 'समकालीन भारत : जाती अंताची दिशा' लेखक प्रा. डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड), स्मृतीशेष दादू मांद्रेकर पुरस्कार (काव्य संग्रह) 'आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते' कवी डॉ. सुदाम राठोड (नाशिक), स्मृतीशेष सूर्यभान साळवे पुरस्कार (कादंबरी) 'हक्कसोड' मिलिंद जाधव (चिखली जि. बुलडाणा) व स्मृतीशेष सरुबाई साळवे पुरस्कार (आत्मकथन) 'विंचवाचं तेल' सुनीता भोसले (शिरूर जि. पुणे) या पुस्तकास जाहीर करण्यात आले आहेत.

     रुपये दोन हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार निवड समितीत प्रा. डॉ. सदानंद देशमुख, प्रा. श्याम मुडे, राजानंद सुरडकर आणि रमेश आराख यांचा समावेश होता. दि. ६ मार्च २०२२ रोजी बुलडाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक हे पुरस्कार दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages