प्रसिध्द चित्रकार -कार्यकर्ते प्रा. दिलीप बढे यांचे निधन! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 February 2022

प्रसिध्द चित्रकार -कार्यकर्ते प्रा. दिलीप बढे यांचे निधन!

औरंगाबाद - "दलित युवक आघाडी-दयुआ" चे कार्यकर्ते आणि एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतील चाहते, अंबाजोगाईचे (जी. बीड) प्रा. दिलीप बढे यांचे 5-6 फेब्रुवारी मध्यरात्री औरंगाबादला हृदय विकाराने निधन झाले.


"दयुआ, नंतर भारिपचे नेते प्रा. एस. के. जोगदंड, प्रा. माधव मोरे सर, प्रा. अविनाश डोळस, प्रा. विश्वप्रकाश सिरसट यांचे दिलीप सहकारी. आंबडवे गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सर्व कलात्मक काम आणि म्युरल प्रा दिलीप बडे यांनी केली आहेत. त्यासाठी ते आंबडवे गावात जाऊन राहिले होते. 

5 तारखेला रात्री 9 पर्यंत डॉ अविनाश आणि जॅकलिन  डोळस यांची मुलगी आदिती च्या विवाहनिमित्त आयोजित स्वागत समारंभात प्रा. दिलीप बढे व वहिनीही सहभागी होत्या.  त्यानंतर तीन तासांतच ही बातमी येणे हा धक्का होता. 


एक चांगले चित्रकार, कला, समीक्षक, शिक्षक आणि प्रखर आंबेडकरवादी सहकाऱ्याला मुकलो आहोत. 



No comments:

Post a Comment

Pages