पिण्याच्या पाण्यासाठी दलितांना स्वतःचा गाव सोडावा लागणे हा महाराष्ट्राला कलंक असल्याचा भीम आर्मी संरदप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांचा घणाघात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 February 2022

पिण्याच्या पाण्यासाठी दलितांना स्वतःचा गाव सोडावा लागणे हा महाराष्ट्राला कलंक असल्याचा भीम आर्मी संरदप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांचा घणाघात

अमरावती :

                मिस्टर गांधी आम्हाला आमची मातृभूमी आहे की नाही ? असा रोखठोक आणि जळजळीत सवाल बरोबर ९० वर्षांपूर्वी पुणे करार करतांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना केला होता.दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतरही हाच सवाल ह्या देशातील प्रत्येक शोषित-वंचित-पीडित-सर्वहारा समूहातील प्रत्येक व्यक्ती विचारीत आहे.स्वतःला पुरोगामीत्वाचा टेंभा घेऊन मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सुद्धा जातीयवादी अतिरेक्यांच्या नफरतखोर कारवायांनी उच्छाद मांडला आहे.प्रत्येक भारतीयांना भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारापासून इथल्या दलित समूहाला वंचित ठेवल्या जात असून त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे साक्षात क्रांतीसंत गाडगेबाबांच्या महान कर्मभूमीत म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर ह्या गावातील वार्ड क्र.१ मध्ये गेल्या २० वर्षांपासून दलितवस्तीला पिण्याचे पाणी देण्यास नाकारल्या गेले आहे.ह्या सर्व अन्यायाचा परिपाक म्हणजे शेवटी  दलित बांधवांनी आपला स्वतःचा गाव सोडून दिला.आणि दूरवर सुमारे ०२ किलोमीटर अंतरावर संवैधानिक मार्गाने आंदोलन छेडले.याची माहिती मिळताच भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य संस्थापक प्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.ह्यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिनभाई खरात ( शिदनाक) हेही उपस्थित असल्याची माहिती राज्य मुख्यप्रवक्ता भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराला माहिती दिली आहे.

                  भीम आर्मी संरदप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिनभाई खरात यांनी सामाजिक पीडित ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले .त्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की , येत्या आठ दिवसांत संबंधित गुन्हेगारांवर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कडक शिक्षा करून , दलितांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात संवैधानिक आंदोलन उभारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. स्वतंत्र भारतात आजसुद्धा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी दलितांना गाव सोडावा लागणे हाच आमच्या भारताला कलंक आहे.मानवतेच्या मूलभूत अधिकारांचे हनन आहे , महाराष्ट्राला ही बाब लाजिरवाणी आहे.असले प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाहीत याची नोंद संबंधितांनी जरूर घ्यावी.

                  आंदोलकांना भेटताना भीम आर्मी संरदप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे , रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिनभाई खरात , भीम आर्मी संरदचे विदर्भप्रमुख मा.आशिषभाई सोनटक्के , रिपाई मुंबई प्रदेशाध्यक्ष मा.राजुभाई थाटे , भीम आर्मी संरद नागपूर जिल्हाप्रमुख मा.आदेशभाऊ शेंडे , अंकुरजी दुपारे ,नयनभाई पाटील , अमोलकुमार चिमनकर , सुरजजी पाटील , सुनीलजी गाडगे , रोहितभाई नंदेश्वर , नरेंद्रभाई शेंडे आणि शुभम कांबळे उर्फ निक्की यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराला दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages