स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 20 February 2022

स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण


नायगाव : तालुक्यातील मौजे. दरेगाव येथील माजी. सरपंच जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या द्दितिय पुण्यस्मरणार्थ युवा साहित्यिक सोनू बबन दरेगावकर यांच्या पुढाकाराने मौजे. दरेगाव  येथे १९ फेब्रुवारी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेगाव येथे बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी ज्या ज्या महान महामानवांनी स्वतःला झिजवले म्हणून तर आज माणसांच्या जीवनाला एक नवचैतन्य उगवले अशा सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, सौ. शोभाताई संभाजी पा. शिंदे  सरपंच दरेगाव  तर प्रमुख अतिथी म्हणून, मा. विनोद पाचंगे समतादूत बार्टी पुणे, मा. अमितकुमार कांबळे समतादूत बार्टी पुणे, मा. संजय मूधळे  सहशिक्षक भूकमारी, मा. व्ही.एल. अंगरोड सर सहशिक्षक दरेगाव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमासाठी, मा. बापूराव उमराव पा. शिंदे ( शालेय समिती अध्यक्ष दरेगाव )मा. आर. एल. झुडुपे ( मुख्याध्यापक जि.प. प्रा. शाळा दरेगाव ), मा. मारोती तुकाराम पा. शिंदे ( वनविभाग अध्यक्ष दरेगाव ), मा. बालाजी पाटील शिंदे ( तंटामुक्ती अध्यक्ष दरेगाव ), मा. विनायक विश्वांभर आमनवाड ( पोलीस पाटील दरेगाव ), मा. संभाजी विठ्ठलराव पा. शिंदे, सौ. स्वाती चंद्रप्रकाश पा. शिंदे ग्रा. प. सदस्य दरेगाव, सौ. अरुणाबाई गणेश गजेलवाड ग्रा. प. सदस्य दरेगाव, मोहन बैलके ग्रा. प. सदस्य दरेगाव, मा. गंगाधर रेड्डी टाकळीकर, आनंदराव पा. शिंदे, गणेश गजेलवाड, केशव पा. शिंदे, किशन पा. शिंदे, गोविंदराव वाघमारे, नरहरी कानगुले,  माधव आमनवाड, गंगाधर शिंदे, , सतीश शिंदे, राहुल शिंदे, श्रीनिवास शिंदे यांची उपस्थिती होती.


तर कार्यक्रमासाठी, नारायण बैलके, व्यंकटी बैलके, दत्ता बैलके, उत्तम बैलके, साईनाथ बैलके, मारोती बैलके, रामदास घोणशेटवाड, सतीश बैलके, सचिन बैलके, श्याम बैलके, गणेश बैलके, विकास घोणशेटवाड यांनी परिश्रम घेतले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा साहित्यिक सोनू दरेगावकर,  यांनी केले तर आभार मा. व्ही. एल. अंगरोड  मानले

No comments:

Post a Comment

Pages