पुणे जिल्ह्यातील युवकांनी शोधली सुधागड पाली, खडसांबळे(नेणावली) येथील अपरिचित बुद्ध लेणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 21 February 2022

पुणे जिल्ह्यातील युवकांनी शोधली सुधागड पाली, खडसांबळे(नेणावली) येथील अपरिचित बुद्ध लेणी

मुंबई :

महाराष्ट्रातील युवा लेणी संवर्धक समूह यांच्या मार्फत रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यातील खडसांबळे(नेणावली) ठिकाणी असणाऱ्या एका अपरिचित बुद्ध लेणीचा शोध लावला आहे.


सदर लेणीसंवर्धकाना या अपरिचित लेणीबाबत ची माहिती काही वर्षा पूर्वी मिळाली होती. खडसांबळे बुद्ध लेणीच्या (नेणावली) लेणीच्या उत्तरेस किमान 1-5 किमी अंतरावर हे लेण असून या लेणीपर्यंत जाण्यासाठी प्रकारची वाट नाही आहे. 


पुणे जिल्ह्यातील लेणीसंवर्धक  समूहातील समाधान सोनवणे, मनोज गजभार, सागर कांबळे, कपिल कांबळे यांनी ह्या अपरिचित लेणीचा शोध घेण्यासाठी एक दिवस अगोदर म्हणजे 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपला प्रवास पुण्यावरून सुरू केला होता. हा लेणी संवर्धक समूह रात्रीचा प्रवास करुण खडसांबळे या गावी पोहचला होता. गावातून चालत प्रवास करत रात्री 10:39 वाजता लेणी संवर्धक समूहाने खडसांबळे लेणी गाठून विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून संपूर्ण खडसांबळे लेणीचा आढावा घेऊन अपरिचित लेणी किती अंतरावर असेल याचा अंदाज घेऊन आपले संशोधन कार्य सुरू केले.


घनदाट झाडीतून वाट काढत आणि वाटेत येणाऱ्या संकटाना तोंड देत लेणी संवर्धक समुहाने अर्धा टप्पा गाठला. वाटेत एक मोठी दरी असून ती पार करून 60% चालत शेवटच्या टप्प्यात लेणी संवर्धनी आपले पाऊल टाकले. शेवटच्या टप्प्यात नैसर्गिक आपत्तीने कोसळलेला कातळ पाहायला मिळाला व त्याचं टप्प्यात अपरिचित लेणी समूह देखील त्यांनी पाहिला. या लेण्यांचा अभ्यास करताना लेणी संवर्धकांच्या लक्षात आले की हे लेण बौद्ध भिक्खुं साठी आणि व्यापाऱ्यांसाठी लांबचा माळ घाटाचा प्रवास करून आल्यावर थांबण्याचा किंवा विश्रांती करण्यासाठी बांधलेल १ निवासस्थान किंवा शूंन्यागार होय. सदर उपस्थित लेणी संवर्धक समाधान सोनवणे यांनी लेणीचे मोजमाप घेण्यासाठी घेऊन आलेल्या मोजपट्टी द्वारे संपूर्ण लेणीचा मोजमाप घेण्यात आले. या लेणी मध्ये बसण्यासाठी आणि विश्रांती करण्यासाठी ३ बाक निर्माण करण्यात आले आहेत. या लेणी वैशिष्ट असे की ही लेणी पुढच्या दिशेने भिंतीने सुशोभीत केली असावी आणि त्यात भिंतीमध्ये १ मोठी खिडकी निर्माण केली असावी. जेणेकरून या ठिकाणाहून खडसांबळे बुद्ध लेणी पाहता यावी. अशाप्रकारे या दुर्लक्षित बुद्ध लेणी पर्यंतचा प्रवास लेणी संवर्धक समूहाने केला. सदर लेणी समूहाने येत्या काळामध्ये या लेणी पर्यंत येण्यासाठी महाराष्ट्रातील लेणी संवर्धकांना आव्हान केले असून त्यासोबतच या लेणी चे संवर्धन करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया दिली.


खडसांबळे येथील मुख्य बुद्ध लेणी समूहाचे निर्माण कार्य इ. सन.पूर्व दुसऱ्या शतकापासून सुरू झाले होते. या मुख्य लेण्या थेरवाद परंपरे नुसार कोरण्यात आल्या असून या मध्ये विहार. चैत्य स्तूप. भिक्खू निवास. पाण्याच्या टाक्या (पोड्या) अशा प्रकारचे कोरीव काम आढळून येते. मुख्य बुद्ध लेणी संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे. या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे अनेक लेणी समूह मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले आहेत. याचप्रमाणे पुणे जिल्यातील युवक लेणीसंवर्धकांनी केलेले संशोधन इतिहासात अजून भर पाडत आहे.


No comments:

Post a Comment

Pages