किनवट ( प्रतिनिधी ) :
कवयित्री प्राध्यापिका वंदना तामगाडगे यांचा 'सखी जागी हो ' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा 18 फेब्रुवारी 2022 रोजी मातोश्री कमलाबाई ठमके सभागृह महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे होणार आहे.
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या क्रांतीसूर्य प्रकाशनने प्रकाशनासाठी सज्ज केलेल्या 'सखी जागी हो' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी साहित्यिक प्राध्यापक रविचंद्र हडसनकर तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके , बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. पंजाब शेरे आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे शिक्षक गौतम दामोदर हे राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती शेरे करणार असून सूत्रसंचालन सीमा नरवाडे ह्या करणार आहेत तर आभार माधुरी मुनेश्वर ह्या करणार आहेत. कार्यक्रमापूर्वी 'गीते प्रबोधनाची ' या कार्यक्रमात गायिका मंगलाताई कावळे, शीलाताई सेलूकर, लक्ष्मीबाई घुले यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे उत्तम कानिंदे , रमेश मुनेश्वर , महेंद्र नरवाडे, सुरेश पाटील , रुपेश मुनेश्वर , नागसेन तामगाडगे, प्रमोद तामगाडगे, राजा तामगाडगे, प्रल्हाद भवरे, भारत कावळे, सुरेश घुले, विश्वनाथ घुले, आदींनी केले आहे .
No comments:
Post a Comment