मुक्त लेखनिला शब्दबध्द करणारा काव्यसंग्रह ' शब्दगंध ' - राणी मोहनराव नेम्मानीवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 February 2022

मुक्त लेखनिला शब्दबध्द करणारा काव्यसंग्रह ' शब्दगंध ' - राणी मोहनराव नेम्मानीवार


महाराष्ट्र हि जशी संताची पवित्र भूमी आहे.. अगदी साहित्यासाठी ही पोषक असा इतिहास महाराष्ट्राचा आहे... महानुभाव पंथापासून तर वारकरी संप्रदायाने मराठी भाषेचा वारसा जपलेला आहे.  कविवर्य केशवसुतापासून तर कुसुमाग्रजांपर्यंत मराठी शिलेदारांनी  त्यानंतर अनेक साहित्यिकांनी आपली लेखणी अखंड व अविरतपणे चालवत मराठी साहित्यात आपली मोलाची भर घातलेली आहे. समाज व साहित्य यांचा फार निकटचा संबंध असतो. तत्कालीन समाजाचे सामाजिक जीवन, पर्यावरण या बाबी  साहित्यातून प्रकट होत असतातच.. कवी हा समाजाचा, स्वत:च्या अंतर्मनाचा शोध कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतात... जे कवींना दिसते ते सामान्य लोकांना सहज दिसत नाही.. म्हणून कुसुमाग्रज म्हणतात.. 

"काचेतून दिसे जनाला, धोंड्यातून दिसे कवीला... " 

अशी वृत्ती स्विकारुन साहित्यिक

आपला मार्ग क्रमण करित असतात.. अनेक कवितासंग्रह साहित्य जगात प्रकाशित होत असतात... अनेक कलावंताच्या कविता संकलन करुन अलिकडे "प्रतिनिधीक कवितासंग्रह "हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम संपादक व प्रकाशक राबवत आहेत.. त्यापैकीच एक वैशिष्ट्य पूर्ण उपक्रम म्हणजे...३ जानेवारी २०२२ ला प्रकाशित झालेला  " शब्दगंध "... हा कवितासंग्रह !संग्रहातील अनेक कविता वाचकांच्या द्रुष्टीने चिंतनीय आहेत.. कवितांचे मुखपृष्ठ एक

स्त्रीच्या हातात लेखणी असून ती लिहीत आहे या चित्राचे असून.. मराठी साहित्य जिच्यामुळे प्रकाशात आले.. अशी मध्ययुगीन महान कवयित्री महदंबेचे... तसेच गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 'थेरीगाथा ' सारखे दुर्मिळ साहित्य समाजातील स्त्री वर्गाने पूढे आणलेले आहे.. याची प्रचीती देणारे आहे... शब्दगंध संग्रहाची अर्पणपत्रिका .. प्रजासत्ताक लोकशाहीच्या अमृत महोत्सवानिमित्य भारतातील स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या समस्त वीरांना, समाजसुधारकांना  अर्पण करुन.. देशाभिमान यातून दिसून आलेला आहे.. !' किशोर ' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची पाठराखण प्रस्तावनेच्या रुपात दिसून येते. संग्रहाच्या  अंतरंगात राज्यातील विविध भागात काम करणाऱ्या शिक्षकवर्गांच्या एकूण ६३ कवितांचा समावेश यात केलेला आहे.. 'शब्दगंध' या शिर्षकावरच संपादक मिलिंद जाधव यांची शब्दगंध नावाची कविता  वाचायला मिळते... या कवीतेत शब्द महिमा वर्णिलेला आहे.. त्यानंतर सुंदर असे शिर्षक कवितांना लाभलेले आहेत.. सखी निर्भिड हो (प्राचार्य शुभांगी ठमके), माणसे (प्रा.गजानन सोनोने), पाऊलखुणा ( प्रा. पंढरीनाथ शेळके),  शाळा कवा करता सुरु ( रविंद्र जाधव), संस्कार ( माधुरी देवरे) अशा काव्यातून स्त्री प्रेरणा, माणसाचा आत्मकेंद्रीपणा, कोरोना काळात शाळांची झालेली दुरावस्था स्पष्ट होते.
मैत्री ( अनिता मेस्त्री), ये आई ( शिवशंकर पाटील ),रचनाकार,  (माधुरी पाटील), कोजागरी, ज्वलंत आहे...गझल (चंद्रकांत कदम).... या कवितांतून प्रेम, रुतू,देशभक्ती , शिक्षणाचा प्रत्यय वाचकांना येतो. यानंतर 'पानगळ ' ( राणी नेम्मानीवार) या कवितेतून घरातील जन्मदात्या वडिलांच्या वियोगाची वेदना कवयत्रीने मांडलेले आहे... 

"त्या हिरव्या पानांच्या फांदीवर

माझ्या स्वप्नांच घरटं

कुठं असेल म्हणून.. " 

या ओळी मनाला चटका लावून जातात.... पूढे 'बाप माझा' या कवितेतून (प्रा. विलास हनवते) या कवींनी कष्टकरी व शेतकरी बापाची सल .. नापिकीतून व्यक्त केलेले आहे.गझल ( वैशाली कयापाक), कन्या ( गजानन पाटील), पाऊस (माधुरी काकडे)  उन्हात (धनंजय सोनकांबळे), झुंज ( वर्षाराणी मुस्कावाड), तहान ( व्यंकटी कुरे), सावित्रीबाई फुले ( संध्या रायठक), .. आगाज, ( सुरेश इंगळे),  बा स्वातंत्र्या ( साहेबराव डोंगरे),  मानवता धर्म (सुनिता येवले)....या कवितांतून..  न्याय, मानवता, सत्य, स्वातंत्र्य, श्रमप्रतिष्ठा व मातृत्वमूल्य स्पष्ट होते...वाचत असताना वाचक हरवून जावा व काव्य जगात रममाण व्हावा अशा सर्व रचना कवी व कवयत्रीने साकारलेल्या आहेत. यानंतर  प्रत्येक कवितेचा गंध शब्दांतून दरवळतो तो असा.... माझी आई (बबन मुनेश्वर) आईविषयी आठवणी...  बदल (देविदास वंजारे)... शाळेतून विश्व परिवर्तन... सोबती ( उषा नळगिरे)  प्रेरणादायी माणसांचा सहवास..  गझल होत नाही.. (भुमय्या इंदूरवार) .... भूतकाळ व वर्तमान जीवन यातील तफावत.. भक्ती (अनिता मुंगसे) ईश्वरा विषयी  भक्ती रस.... कैकदा.. (प्रा.विनोद कांबळे)... जगातील स्वार्थपरता.... नकळत सारे घडले.. (सारिका मुसळे)... प्रेमाची संकल्पना..... राजकारण

( सागर चेक्के)   वर्तमान काळातील नेते व लोकशाहीची हरवलेली मूल्ये.... स्वच्छ भारत.. ( स्वप्ननिला पंडित) परिसर स्वच्छतेचे महत्त्व.... कल्पवृक्ष ( उर्मिला परभणकर) स्त्री कर्तुत्वाविषयी क्रुतज्ञता.... व्रुक्षारोपणाचे महत्त्व... झाडे लावूया... (अंबादास इंगोले)  या कवितेतून वृक्षाचे संवर्धन व पर्यावरणातील झाडांचे वाढते महत्त्व कवीने सांगितलेले आहे... महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीचे दर्शन 'बैलपोळा ' या कवितेतून घडते.


'लेखणी ' हे समाजपरिवर्तनाचे एक शस्त्र असून ती कवी व लेखकांची आवडती असते.. ही (कल्पना राठोड ) यांच्या लेखणी तून जाणवते.. 'आयुष्य ' हे सुंदर असून जगायचं कसं.. हा संदेश घेऊन येतात कवी ( सिद्धार्थ सपकाळे) यानंतर प्रा. वंदना तामगाडगे यांनी 'अंधश्रद्धा ' बनूया आजचे सुधारक या रचनेतून.... सांगून गेले बुद्ध करु नका युद्ध.... असा गौतम बुद्धांनी मानवजातीला दिलेला शांती व अहिंसेचा संदेश

वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे.. 'विपरित' या काव्यातून सद्यस्थितीत हरवलेल्या

मानवी मूल्यांविषयी खंत व्यक्त केलेलं आहे... कवी मिलिंद कंधारे.... पहिला पाऊस पडतो व मातीचा गंध  आपल्याला सुखावून जातो.. विविध रंगाच्या फुलांची किमया न्यारीच असते याची कल्पना देतात ..कवयित्री ( महानंदा चिभडे)... गंध मातीचा या काव्यातून.. अनमोल श्रम, व उलगुलान रेखाटणारे कवी महेंद्र नरवाडे आदिवासी नायक, क्रांतिकारक बिरसा मुंडाच्या कर्तुत्वाचे क्रांतीरस वाचकांना देतात.
आस, शोधता स्वतः ला (रतन कराड),  जवान, सावित्रीबाई (संतोष पहूरकर) फुले... जिद्द, रंग जीवनाचे ( डाॅ. प्रतिभा झगडे), बिन पैशाचा सल्ला (सोनबा  दवणे), व्रुद्धाश्रम, स्त्री भ्रूण हत्या (नंदा नगारे), सतयुगाची नादी, आमची सावली (प्रा.वाठोरे), श्रावण मास, आई ( मंगला शेटे), शासन (भारद्वाज सर्पे)... अशा कवितांतून  निसर्ग, मानवी नाते, समाज, समाजसुधारकांचे कार्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार.. रंगसंगती या बाबींची मनसोक्त अभिव्यक्ती... रसिकांना जाणवते... राधाकृष्णाची प्रीती.. सावळबाधा... योगासनाचे महत्त्व योग निरामय  (कोमल शिंदे) .. कवी ( रुपेश मुनेश्वर) यांच्या.. रानगंध.... प्रेयसीच्या भेटीची उत्कटता...शेतकरी बाप ,अहोरात्र राबणारा  कृषक बाप.. मुलाला शुभेच्छा, स्वागतगीत, ( उषाताई शेटे), निरोप माझा घेतांना,...जीवन (राजेश पाटील), संकटातून ही जीवन आनंदाने जगावे हे सूत्र कवीने सांगितलेले आहे.अंगणातील तुळस  आणि भारतीय स्त्री यातले नाते फळांचे आरोग्यासाठी महत्व सांगतात... कवयत्री प. प्रतिभा झगडे... आपल्या तुळस व फळे या कवितेतून... शेषराव पाटील यांच्या ..एकात्मता, फूल आणि कळी या रचनेतून एकात्मतेचे राष्ट्रीय मूल्य तसेच सकारात्मक विचारांची सांगड घातलेली आहे.   मराठी भाषेचे ममत्व.. माझी माऊली मराठी... निळ्या सूर्याच्या ( ज्योती देशमुख),  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाविषयी स्वमनातले कृतज्ञभाव यातून कवयित्री व्यक्त करते.क्रांती, सजली भूमी (रामस्वरूप मडावी) राष्ट्रभक्ती वर्षा रुतूतील निसर्गरम्य तेचे वर्णन कवी करतात. कोरोनाचे संकट, देशाची होत असलेली अधोगती मोठ्या खंताने सांगतात. कवी जितेंद्र आमटे... आपल्या नसलेला देव, व काही कळत नाही याकवितेतून.. यानंतरही कवितेची श्रुंखला संपत नाही... पूढे अतूट हे नाते, ओढ आईची, (माया सलगकर) कवी, ध्येय वेडा (भोला सलाम) हे चालले आहे, सभ्यतेचे व्याकरण (प्रा.सुभाष गड लिंग) माती, माझा बा, ( प्रकाश टाकळीकर) ... यांच्या रचनेतून  संवेदनशीलता,  महत्वकांक्षा, खंबीरता, मायमातीचे नाते , शेतकरी आत्महत्या, या गोष्टीचा साक्षात्कार वाचकांना घडतो. मनाला भ्रमरेची उपमा देऊन अंतरमनाचा ठाव घेते कवयत्री (सीमा पाटील) मनभ्रमरा या कवितेतून... भारतीय रुढी, परंपरा, राजकारण, संविधानाच्या मूल्यांचा गौरव करतांना रमून जातात कवी (एम.एस.भरणे) आपल्या लोकशाही वाचवा व योगदान... या काव्यात....!!! 
शेवटी संपादक रमेश मुनेश्वर यांची कविता वाचायला मिळते... 'शब्द ' या कवणातून कवी शब्दाची थोरवी गातात ते लिहितात..

" उजळतील दाही दिशात शब्द

दरवळतील आसमंतात शब्द "

संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे शब्दापासून आरंभ व शब्दप्रवासातील शेवटं म्हणजे शब्दचं...

भारतीय युवकांना विशिष्ट प्रेरणा देत संपादकांनी 'उठा युवकांनो ' या रचनेतून विज्ञान युगाचे, माहिती तंत्रज्ञानाचे अनमोल संदेश आधुनिक युवकांना दिलेले आहे.... कवितेच्या मलपृष्ठावर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा शुभेच्छा संदेश म्हणजे शिक्षकांच्या लेखनिला दिलेली 'बळ ' आहे... हा संदेश कोरोना काळातही शिक्षकांनी जे सातत्याने विविध उपक्रम राबविले ले आहेत त्याविषयी प्रोत्साहनपर आहे... संपादक रमेश मुनेश्वर व मिलिंद जाधवनी आपल्या धडपडीतून साकारलेला व सर्व शिक्षकांना एक मुक्त व लेखन व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा हा प्रतिनिधिक कवितासंग्रह आहे.... एकंदरीत संग्रहातून मानवी जीवनातील व निसर्गातील चराचर साहित्य मूल्ये उजागर झालेले असून ते  नक्कीच विश्वात्मक ठरतील ... पुढील कार्यास आभाळभर शुभेच्छा....!!! - राणी मोहनराव नेम्मानीवार  

 किनवट ( कवयत्री, लेखिका)

No comments:

Post a Comment

Pages