वैज्ञानिक तत्वावर आधारलेल्या धम्माचा अंगीकार करून जीवनाचे सोने करा - भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 February 2022

वैज्ञानिक तत्वावर आधारलेल्या धम्माचा अंगीकार करून जीवनाचे सोने करा - भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई


किनवट,दि.१४ : वैज्ञानिक तत्वावर आधारलेल्या धम्माचा अंगीकार करून जीवनाचे सोने करा, असे प्रतिपादन समता नगर येथिल बुद्धभुमी परिसरातील स्मृतिशेष पँथर प्रकाश नगराळे नगरीत अकराव्या जागतिक बौद्ध परिषदेत शनिवारी(ता.१२) धम्म देसना देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दिक्षाभुमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले.

    धम्म परिषदेच्या पहित्या सत्रात ते बोलत होते. पुढे बोलतांना ससाई यांनी सांगितले की,  धम्म चळवळ ही गतिमान करण्यासाठी धम्म परिषद हे एक उत्तम माध्यम आहे. वैचारिक व शैक्षणीक प्रबोधन या मंचावरुन झाले पाहीजे. आपण धम्म परिषद आयोजकाचे अभिंनदन करतो. मानवांनी जिवनात अंगिकार करून पंचशील व अष्टांग मार्ग स्विकारल्यास जीवन सुखकर बनते .

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भदंत ससाई यांच्या हस्ते पंचशिल धम्म ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी भन्ते झेन मास्टर, पुणे, भन्ते हर्ष बोधी, भन्ते सागर, भन्ते नागसेन, भन्ते धम्म बोधी, भन्ते नागानंद यांची प्रमुख उपस्थिती होती.



      यावेळी सुनिल भरणे, पुर्णा, जागतिक धम्म परिषदेचे आयोजक राहुल कापसे, संयोजक अभय नगराळे, स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, अध्यक्ष दया पाटील, निमंत्रक दत्ता कसबे, सचिव संदिप कावळे , संयोजन समितीचे पदाधिकारी व उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे  संयोजन बौध्दाचार्य अनिल उमरे, प्रविण गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन प्रशांत वंजारे यांनी केले, तर आभार सचिन गिमेकार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages