पहिल्यांदा शिवजयंती कोणी सुरु केली? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

पहिल्यांदा शिवजयंती कोणी सुरु केली?

राष्ट्रपिता जोतिराव फूलेयांनी १९ फेब्रुवारी १८६९ ला सार्वजनिक स्तरावर शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरूवात केली. चाफळकर स्वामी आध्यक्ष तर स्वतः रा. फूले सेक्रेटरी होते. रा. फूलेयांनी शुरु केलेल्या शिवजयंतीच्या वेळी बाळ गंगाधर टिळक हे १३ वर्षाचे होते.(टिळकांचा जन्म १८५७ आणि मृत्यू १९२०)

शिवजंयतीत बहुजन भरभरुन सामिल होऊ लागले. एक दिवस का होईना ब्राम्हण एकाकी पडु लागला.

जसजसा बहुजन जागृत होऊ लागला तसतसा ब्राम्हणा विषयीचा आदर कमी कमी होत आहे हे पाहुनच १८९५ मध्ये टिळक शिवजंयतीत सामील झाले. टिळकांनी शिवजंयती बरोबरच सार्वजनिक "गणेश ऊत्सवाची सुरूवात केली. बहुजनात संभ्रम निर्माण झाला. शिवजयंती मागे पडत गेली. व गणेश उत्सव वाढत गेला .


शिवजन्मोत्सव १९ फ़ेब्रुवारीला का साजरा करावा?


शासनाने संशोधन करून २००१ मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली.

या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे,"कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर,निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.


तिथी प्रमाणे शिवजंयती का साजरी करू नये ?


कारण वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय तिथी प्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते.

उदाहरण म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च,२००३ ला २० मार्च,२००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी

आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की , टिळक, गांधी, नेहरू तसेच हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर अशा अनेकांची जयंती सर्वत्र इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे का? आणि वैदिक ब्राह्मणी कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह ब्राह्मणी लोक का धरतात?


आपण पाहूया वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय कालगणना म्हणजे नेमकं काय?


वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रा नुसार कालगणा विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन कालगणना वैदिकांचे आहेत. यातही बोंब अशी की या वैदिक ब्राह्मणी कालगणनेमध्ये भारतातच अनेक बदल आहेत.

उदाहरण विक्रम संवतच्या वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने पुढे आहे .म्हणजे तामिळनाडूत ३०० वी शिवजयंती असेल तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असेल. याचा अर्थ इतकाच की वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्र म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही.


दैनंदिन व्यवहारात सर्व सामान्य भारतीय वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात. जर वैदिक ब्राह्मणीधर्मशास्त्रीय तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही. अर्थात आपल्याच महापूरूषांच्या जन्माचे दाखले अशा लोका कडून घ्यावे लागेल जे भटबामण आजहि आपल्या मुलांची नावे शिवाजी- संभाजी ठेवत नाहीत.


जेव्हा पासून शिवजंयतीची सुरूवात १९ फेब्रुवारीला झाली तेव्हा पासून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर देखील शिवजंयती साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणी मनुवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माध्यमातून स्वत:चे स्वार्थी धर्मकारण आणि राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात.


वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात बहुजनां मध्ये संभ्रम निर्माण होतो अर्थात एकवाक्यता राहत नाही. वैचारिकांचे वैचारिक स्तरावर विभाजन होते. बहुसंख्याक बहुजन अल्पसंख्यांक होतो आणि अल्पसंख्यांक वैदिक ब्राह्मण बहुसंख्याक होते. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच मंगलमय वातावरणात साजरी केली पाहिजे


तेव्हा शिवप्रेमी यांना विनंती कि,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी आणि जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी जेणेकरुन शिवजंयती जगभरात साजरी केली जाईल.


"शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणी निर्माण केला?


गेले अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात या अशा विचारप्रवाहांमुळे शिवाजी महाराजांची सध्याची जन्मतारीख कशाप्रकारे ठरवण्यात आली याचा विचार करण्याचा प्रयत्न येथे करू.


तारीख आणि तिथीचा हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1)वा.सी.बेंद्रे, 2)न.र.फाटक 3)ग.ह.खरे, 4)द.वा.पोतदार, 5)डॉ.आप्पासाहेब पवार, 6)ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली.

वादग्रस्तबाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली. ज्याकामाला २ वर्ष लागतात तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता. यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली. १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाला जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या. या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1)पुरंदरे, 2)बेडेकर, 3)मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली. शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध होते.


1)जयंत साळगांवकर, 2)पुरंदरे, 3)बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रहधरला. शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोनत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून पुरुरंदरे, बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे. यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले. 


ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय?


तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना आहे. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजनसमाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा डाव आहे. 


छत्रपती शिवाजी राजे तर विषेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत अडकविण्याइतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकराने तारीख-तिथीचा वाद निर्माण केला. तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी भटजी तिथीचा आग्रह धरतात. तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला.

शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. त्यांची कारणे इतिहासात दडलेले आहे


वैदिक राजाभिषेक

शिवाजी महाराजांचा राजाभिषेक "ब्राह्मणांना दंडित(शिक्षा) करण्याचा अधिकार " होय.हे वैदिक ब्राह्मणांना माहिती असल्यानेच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला वैदिक ब्राह्मणांनी विरोध केला परंतु 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गागा भट ह्या वैदिक ब्राह्मणाने दोन शाश्त्राचा अटीवर सहमती दिली.

१ संमति शात्र :- वैदिक धर्म शात्रांच्या संमतिने शिवाजी हा राजा होईल.

२ सत्ता शात्र :- शिवाजी राजा कडे अष्टप्रधान मंत्री मंडळ असेल त्या आठ मंत्र्या मध्ये सात ब्राह्मण मंत्री असतिल पहिला मंत्री "अमात्य" रामचंद्र पंत ह्याला

हुकूमतपन्हा म्हणजे हुकूमत चालवणारा ह्याची अज्ञा प्रतक्ष छत्रपतींनी ऐकिव्यात एवढे "अमात्या"चे अधिकार असेल. (अमात्य रामचंद्र पंत रामदास गोसाव्याचा अनुगृहित होता)


मोरोपंत त्र्यम्बक पिंगळे= मुख्य प्रधान(पेशवा)

नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ= अमात्य, 

अण्णाजी पंत = सचिव(सुरणीस),

दत्ताजी त्र्यम्बक= मंत्री( वाकनविस) 

रामचंद्र त्र्यम्बक= सुमंत,(डबीर,) 

निराजी रावजी= न्यायाधीश,

रघुनाथराव पंडितराव= सदर व मूहतसीब हे 8 पैकीं 7 जण वैदिक ब्राह्मण तर एकटे हंबीरराव मोहिते कुनबी अर्थात शुद्र सरसेनापती होते, त्यांनी युद्ध करणे,फौजा भरती करणे,शिक्षण व प्रशिक्षण करणें,म्हणजे रक्त सांडणे,आणि शहीद होणें आणि 7 वैदिक ब्राह्मण राज्यकारभार हाकणे 


वैदिक राजाभिषेकाच्या माध्यमातून मनुवादी ब्राह्मण शिवाजी महाराजांना  "नामधारी राजे" बनविन्यात यशस्वी झाले. अर्थात, वैदिक राजाभिषेकातुन मनुवादी ब्राह्मणाने हे सिद्ध केले "शुद्र-आतिशुद्राने" समजावे की जर शिवराय सारखा राजा वैदिक ब्राह्मणी धर्माचे पालन करतो, ब्राह्मणांच्या धार्मिक आदेशा प्रमाने वागतो तर ब्राह्मण खरो-खर "ग्रेट" आहेत म्हणुनच शुद्र-अतिशुद्राने देखील भटा ब्राह्मणाच्या शब्दाबाहेर जाण्याचे घोर पाप करु नये


अष्टप्रधाना मधील अमात्य रामचंद्र पंताने हुकूम काढला की, राजाने आपले शहाणपणाची "रिझ" ओढु नये. कार्यभागी "बुद्धिमंत" असतिल , त्यास पुसावे आणि त्यांची जे अधिक बुद्धि असेल ते घेऊन जेणेकरुन योजिले कार्य सिद्धिस जाय ते करावे अर्थात शिवाजी राजे असले तरी ही त्यांनी आपुली बुद्धि वापरू नये जो निर्णय घ्यायचा तो अष्टप्रधानांना विचारून घ्यावा.


गागा भटाच्या वैदिक राजाभिषेक हा वैदिक प्रतिक्रांतिचा ब्राह्मणी करणांचा प्रवास होता


शिवाजी राजाने आपल्या रक्ताचे पाणी करुन स्वतःच्या कर्तुत्वावर , हिमतिवर , मनगटाच्या जोरावर "स्वराज्य" उभारले पण वैदिक ब्राह्मणांनी मनुस्मृतिच्या धर्मशात्राच्या कसोटिवर " राजे श्रेष्ठ की कनिष्ठ ठरवित होते" ब्राह्मणांनी वैदिकधर्माच्या नावाने शिवाजी राजाचा केलेला अपमान सहन न झाल्याने ७८ वयांच्या जीजाऊचे वैदिक राजाभिषेकाच्या १० व्या दिवसी निधन झाले


शाक्तधर्माचा स्वीकार आणि दुसरा राजाभिषेक


वैदिक ब्राह्मण पंडिताच्या प्रतिक्रांतिला रोखन्यासाठी शिवराय व संभाजी महाराज पिता-पूत्राला एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे जाती - व्यवस्थेचा तोल "शाक्ता" सारख्या अब्राम्हणी धर्मा द्वारे आपल्या बाजुला झुकविणे

शाक्त संस्कार सम्पन्ने ।

जातिभेदं न कारयेत ।।

शाक्त धर्माची दिक्षा ग्रहण करनार्यानी जातीभेद करु नये

("शरद पाटिल लिखीत पुस्तक "शिवाजीचे खरे शत्रु कोण "मंहमदि की ब्राह्मणी")

शिवाजी महाराजांनी शाक्त धर्माचा स्विकार केला व तसेच शाक्त राजाभिषेक "निश्चलपुरी"च्या हस्ते केला अर्थात् वैदिक ब्राह्मणी धर्माच्या विरोधात विद्रोह केला


शिवाजी महाराजांनी ३५० किल्ले बांधले परंतु एकाही किल्ल्यावर सत्यानारायणाची पुजा घातली नाही किंवा गणपतिचे मंदिर ही बांधले नाही पण शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधल्या त्याचे पुरावे आजहि सरकार दरबारी व गडावर उपलब्ध आहेत.

शिवाजी महाराजांनी कधिही भविष्य पाहिले नाही की त्यांनी कधीच पंचाग पाहिले नाही - मुहर्त पाहिला नाही किंवा "तिथ" देखील पाहिली नाही प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा मानला


शिवाजी महाराज स्वतः धार्मिक होते पण त्यांनी काटेकोरपणे सर्व धर्म समभावाचे पालन केले. इंग्रज भारतात येण्या अधिपासून निधर्मी संकल्पनेचे त्यांनी "निर्वाहन" केले शिवाजी महाराज हिंदूच्याच नव्हे तर मुसलमानाच्याही धार्मिक प्रतिकांचा सन्मान व आदर करित असत. शिवाजी महाराजाना संत तुकारामांचा जसा आदर होता तसाच हजरत पीर सय्यद बाबा याकूत यांचा ही आदर होता. रत्नागिरी जिल्ह्यातिल समुद्रकिनार्या वर बाणकारच्या खाडि जवळ 

"कलसी" या गावचे मुसलमान संत सय्यद बाबा याकूत यांचा सन्मान ते करत असत. शिवाजी महाराज संत तुकारामांना जसे गुरु मानत तसेच ते हजरत पीर याकूत बाबांनाही गुरु मानत असत.

(संदर्भ:- महाराष्ट्रचा राजा छ. शिवाजी महाराज 

चरित्र पुस्तकात पान-२१९-----काशिनाथ आढल्ये-)


वरील सर्व माहिती वरून हेच सिद्ध होते की शिवाजी महाराजांनी वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रांच्या नियमांचा त्याग केला आणि माणूसकी धर्माचा स्वीकार केला

वैदिक ब्राह्मण आतुन हादरले परंतु आतल्या आत शिवाजी महाराजांची हत्या करण्याचं षडयंत्र बनविण्यात आले त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून शिवरायाच्या कुटूंबात भांडण लावणे, जेने करुन शिवरायाच्या खूना नंतर वैदिक ब्राह्मणावर संशय येऊ नये. वैदिक ब्राह्मणांनी रायगड जागा निश्चित केली. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते सेनापति हंबिरराव मोहिते रायगडा पासुन 250 मैलावर तलबीड गावी होते. कुटूबांतिल प्रमुख नातेवाईक पाचाड गावी असतांना वैदिक ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा विष देऊन खून केला. वैदिकांची योजना सफल झाली. वैदिक ब्राम्हणी योजनेचा दुसरा भाग म्हणजे *संभाजी महाराजांची बदनामी आणि वैदिक मनुस्मृतीच्या ब्राह्मणी धर्मशास्त्रा नियमानुसार संभाजी महाराजांची हत्या* करण्यात आली. वैदिकब्राम्हणी मनुवाद्याचा तिसरा भाग म्हणजेच शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद होय. कारण हा वाद कोणत्या ही राजकीय पार्टी किंवा कोणत्या ही राजकीय नेत्याने निर्माण केलेला नाही तर शिवजंयतच्या तारीख-तिथीचा वाद पुरंदरे, बेडेकर, मेहंदळे आणि साळगांवकरांनी निर्माण केलेला आहे.


-संकलन

अशोक तु.भवरे

संविधान प्रचारक/प्रसारक, नांदेड.

No comments:

Post a Comment

Pages