सेवार्थ फाउंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या उपक्रमास सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

सेवार्थ फाउंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या उपक्रमास सुरुवात

किनवट :

 किनवट तालुक्यातील घोटी या गावी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या या नावाने  दर रविवारी उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमध्ये विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळ स्पर्धा या प्रकारचे वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन करत आहे.हा उपक्रम  5 वी ते 12 पर्यंत सर्व विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात येत असून या रविवारी विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेस मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील  व सेवार्थ फाऊंडेशन चे ऋषिकेश लढे,  तसेच गावातील  तरुणांच्या सहभातुन    हा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी  प्रसेनजित कायपक, अनिकेत कायापक, रंजीत पाटील, नरेश गिमेकार, धममदिप तामगाडगे, रंजीत पाटील, अमन शेख, आशिष शेंडे इ. त्या दरम्यान उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages