१९ फेब्रुवारी जयंती शिवरायांची - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

१९ फेब्रुवारी जयंती शिवरायांची

छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या पर्यत आजवर आणलेली आणि आलेली प्रतिमा आणि वास्तविक शिवरायांची महती आणि महानता समजुन घेणे ख-या अर्थाने शिवजयंतीचे फलित होईल. 


एकतर महात्मा फुलेंचे शिवराय आणि दुसरे ब्राम्हणी व्यवस्थेने मांडलेले शिवाजी..यात तुलनात्मक फरक समजुन घेणे आज तितकेच महत्वाचे बनले आहे.


महात्मा जोतिबा फुले यांचा ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधातिल लढा हा समग्र सांस्कृतिक व सामाजिक लढा होता! यात पर्यायी धर्म ते राजकीय सामाजिक व्यवस्था अभिप्रेत होती! महात्मा फुले यांनी अठरापगड जातींच्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक गुलाम आसणा-या समाजासाठी नवे राजकीय अधिष्ठानाच्या रूपाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" अठरापगड जातींचे राजे छत्रपति शिवराय" म्हणून पुढे आणले! हे छत्रपती ख-या अर्थाने सर्व धर्म समभाव, शेतकऱ्याचे पोषिंदे, कष्टकरी जाती-जमाती यांना राजकीय व्यवस्थेत सहभाग देणारे, ब्राम्हणी व्यवस्थेची गुलामी नाकारणारे  बहुजन प्रतिपालक म्हणून पुढे आणले! 


शिवाजी महाराजांची समाधी शोधायला जोतिबा फुले यांना 3 दिवस लागले! जंगली झुंड़पात, जंगली झाडात उद्ध्वस्त अवस्थेत असलेली शिवाजी महाराज यांची समाधि म्हणजे बहुजनांच्या आत्मसनमानाचा आणि ब्राम्हणी मक्तेदारीच्या विरोधातील इतिहास होता, जो दफन करण्यात आला होता! महात्मा फुले यांनी ही समाधि शोधली नसती आणि पोवाड़ा लिहून, पहिली शिवजयंती साजरी करून हा इतिहास जीवंत केला नसता तर आज काय सत्ता प्राप्तिचे अधिष्ठान असलेले शिवाजी महाराज अस्तित्वात असते ? हा प्रश्न ऐतिहासिक संदर्भात महत्वाचा आहे, कारण महात्मा फुलेंच्या आधी अनेक  सरदार" अस्तित्वात होतेच! मग ही छत्रपतिंची समाधि एवढी उध्वस्त झालीच कशी? हा प्रश्न ही ऐतिहासिक आहे!


      महात्मा फुलेंचे शिवराय हे खऱ्या अर्थाने ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधातील बहुजनांच्या संस्कृतिक-राजकीय विचारांचे अधिष्ठान होते! महात्मा फुले यांनी उभा केलेले "कुलवाडी भूषण शिवराय" हेच खऱ्या अर्थाने ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान होते!  आणि ते शिवरायांचे अस्तित्व नाकारुच शकत नव्हते! महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी करून बहुजन समाजाच्या राजकीय एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरु केली होती! अश्यावेळी चानाक्ष आणि पाताळयंत्री ब्राम्हणी व्यवस्थेस महात्मा फुले यांचे खरे मुळ शिवराय अपहरण करणे, त्यास ब्राम्हणी धार्जिने करणे आणि शेवटी केवळ ब्राम्हणी हिंन्दुत्वाचे रक्षक बनवून आपले वर्चस्व कायम ठेवणे गरजेचे होते! यासाठी त्यांना एक ऐतिहासिक "शत्रु" उभा करणे गरजेचे होते! आणि हा शत्रु मुस्लिम समाज सहज सावज म्हणून उपस्तिथ होता! मग ब्राम्हणी साहित्यकार, लेखक इतिहासकार यांनी "इस्लाम आणि मुस्लिम शत्रु - असे  शिवाजी" मांडन्यास सुरवात केली! यात खोटे, कपोलकल्पित कथा, नाटके, कादम्बऱ्या, सिनेमे, पोवाड़े वगैरे रचून महात्मा फुले यांच्या शिवरायांस थोपवून धरले! आणि ब्राम्हणी शिवाजी जे मुस्लिम विरोधक आहेत यांनाच पुढे आणले. यात बळी गेलेत ते छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी आहुति देणारे अठरापगड जातींचे मावळे, महाराजांचे स्वराज्य, महाराजांचा संकल्प आणि समस्त आठरापगड जाती धर्मातील शुरवीरांना एकत्रित करुन मावळा हे नाव देऊन या मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे राज्य..


खरे पहाता शिवरायांनी आपल्या संपुर्ण हयातीत कधीही तिथी शकुन अपशकुन अंधश्रध्दा कर्मकांड यांना थारा दिला नाही उलट शौर्याने चातुर्य आणि मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले पंरतु कालनिर्णय कॕलेंडरवाले जयंत साळगावकर सारखे ब्राम्हणवादी विचारांचे पाईक असणारे धंदेवाईक लोक महारांजाची जयंती ही तिथीनुसार करण्याचा आग्रह धरतात आणि घोळ घालतात संपुर्ण जगभरातील महान लोकांची जयंती तारखे नुसार होत असतांना महाराजांची जयंती मात्र तिथीनुसार साजरी करायला सांगतात हे ब्राम्हणवादी लोक आपल्या घरातील किवा एकही ब्राम्हण पुढा-यांची जयंती तिथीनुसार साजरी करत नाही मात्र शिवरांयाच्या जयंती बदल मात्र तिथीचा आग्रह धरतात ज्या ब्राम्हणवादी धर्मशास्त्राच्या कायद्याप्रमाणे शिवाजी महाराजांना राजा होता येणार नाही.त्यांचा राज्याभिषेक करता येणार नाही असे सांगितले गेले त्यांच धर्मशास्त्राचे महाराज पाईक कसे होऊ शकतात? ज्या महाराजांनी आपल्या हयातीत पंचाग शकुन अपशकुन हे धुडकावुन लावलेले असतांना त्यांच महाराजांचा जन्मसोहळा तिथीने करन हा महाराजांच्या कार्याचा व विचारांचा अपमान आहे. जिथे तिथी आली तिथे पंचाग आले जिथे पंचाग आले तिथे भटजी आले आपली ही रोजगार हमीची योजना पिढ्यान पिढ्या कायम रहावी म्हणुन या धुर्त ब्राम्हणवादी लोकांनी रचलेला हा डाव आहे..


म्हणुन या पुढे या लोकांच्या भुलथापांना कुठल्याही शिवप्रेमी शिवभक्तांनी बळी न पडता शिवरायांची जयंती एकाचदिवसी संपुर्ण जगभर हर्ष उल्हासात साजरी करावी आणि महाराजांची किर्ती जगभर पोहचवावी.

No comments:

Post a Comment

Pages