शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तिायज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरणानंतर भव्य रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात आली. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे.
No comments:
Post a Comment