औरंगाबाद :
सावित्रीमाई फुले ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने औरंगपुरा येथील फुले दाम्पत्याला अभिवादन करण्यात आले तसेच फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्याची मागणी घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
ह्यावेळी श्रावण गायकवाड ह्यांनी देशात स्त्री पुरुष समानतेचे बीजारोपण केवळ फुले दाम्पत्याच्या क्रांतिकारी चळवळीमुळे झाले असून आज शिक्षणाच्या प्रवाहातून पुढे येत स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे महिला शिक्षित झाल्यामुळेच आपला देश हा पुढारलेल्या-शिकलेल्या विकसित देशांच्या यादीत आघाडीवर आला.
अस्पृश्यता नष्ट करून अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्याचे सामर्थ्य केवळ फुले दाम्पत्याने स्त्रियांना बहाल केले आहे असे प्रतिपादन करून सावित्रीमाई फुले व ज्योतिबांचा गौरव केला.
ह्यावेळी श्रावण गायकवाड, विजयकुमार खंडागळे,पुंजराम जाधव,बंडू कांबळे,रवी जावळे,सचिन गंगावणे,संतोष मोकळे,नानासाहेब म्हस्के,सचिन निकम,मिलिंद बनसोडे,संदीप जाधव,प्राणतोष वाघमारे,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे,बाळू वाघमारे,नवल सूर्यवंशी,सचिन गायकवाड,सचिन शिंगाडे,रामराव नरवडे,बाळू दाभाडे,खोब्रागडे,संजय चिकसे,प्रभू कटारे,अमित वाहुळ,कुणाल गायकवाड, अशोक मगरे,सुबोध जोगदंडे, विशाल धापसे,वसंतराज वक्ते,अविनाश जगधने,सम्यक सर्पे,मोहसीन पठाण,इसा यासिन,राहुल खंडागळे,कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,सागर प्रधान,गुरू कांबळे, शैलेंद्र म्हस्के आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment