बार्टी संस्थेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 10 March 2022

बार्टी संस्थेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पुणे :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे येथे गुरुवार दिनांक 10 मार्च 2022  रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले.

यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, पुणे, श्रीमती वॄषाली शिंदे, विभागप्रमुख  बार्टी, श्रीमती प्रज्ञा मोहिते, कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती मंजिरी देशपांडे, कार्यालयीन अधीक्षक, श्रीमती स्मिता राऊत, सहाय्यक लेखाधिकारी,श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक, श्री शफी शेख,प्रकल्प व्यवस्थापक, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 श्रीमती रजनी वाघमारे, प्रकल्प आधिकारी, डॉ.सारिका थोरात , सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक,श्री.विकास गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन श्री रामदास लोखंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages